हिंगोली (Hingoli ATM Robbery) : अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी तर आता एटीएम केंद्रावर लक्ष केंद्रीत केले असुन शिवाजी नगर भागातील भर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून चोरट्यांनी पोलिसांना आवाहन दिले आहे.
शिवाजी नगर भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या पथकासह ठसे तज्ञ आले होते. या पथकाने काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता चेहरा झाकलेल्या अवस्थेत एक संशयीत व्यक्ती दिसून आला. या प्रकरणात एटीएम व्यवस्थापक मंदार बाजीराव कळसकर रा. एनटीसी हिंगोली यांच्या तर्फे हिंगोली शहर ठाण्यात तक्रार दिली जात होती. घरफोडी, वाहन चोरीच्या घटनांनतर आता चोरट्यांनी एटीएमवर लक्ष केंद्रीत केले आहे.भर रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने नागरीकात भितीचे वातावरण आहे.
Hingoli ATM Robbery
घरफोडीनंतर चोरट्यांचा एटीएमकडे वळविला मोर्चा
Hingoli ATM Robbery: चोरट्यांनी तर आता एटीएम केंद्रावर लक्ष केंद्रीत केले असुन शिवाजी नगर भागातील भर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli ATM Robbery
टैग्स:
Hingoli ATM Robbery
ATM robbery attempt
Hingoli police alert
State Bank of India tampering
property theft linked to crime wave
Shivaji Nagar security concerns
संबंधित सामग्री
अंबेजोगाईत एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे परभणी पोलिसांच्या ताब्यात
शहरातील नवा मोंढा परिसरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनेचा तपास करत असताना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई येथे झालेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नातील चार चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
Jul 04, 2026