Ambajogai ATM Theft

अंबेजोगाईत एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे परभणी पोलिसांच्या ताब्यात

शहरातील नवा मोंढा परिसरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनेचा तपास करत असताना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई येथे झालेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नातील चार चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

अंबेजोगाईत एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे परभणी पोलिसांच्या ताब्यात

Ambajogai ATM Theft

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मानवत, पाथरी येथील आरोपींवर कारवाई

परभणी : शहरातील नवा मोंढा परिसरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनेचा तपास करत असताना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई येथे झालेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नातील चार चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. हे चोरटे परभणी जिल्ह्यातील मानवत व पाथरी तालुक्यातील असून, संबंधितांना पुढील तपासासाठी अंबेजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

परभणी शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या युको बँकेचे एटीएम फोडून साडेपाच लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.

तपासादरम्यान, अंबेजोगाई शहरात २ जुलै रोजी एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. मात्र, एटीएमचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणातील संशयितांना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

तपासात गणेश बालासाहेब काळे, राजेश बाबासाहेब कांबळे, विवेक बबन धारे, मुंजाजी लक्ष्मण आरसाड (सर्व रा. कोल्हा, ता. मानवत), तसेच परमेश्वर सोनाभाऊ बनगर व विष्णू नारायण भिसे (दोघे रा. झरी, ता. पाथरी) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

यापैकी चार चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी त्यांना अंबेजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार केशव लटपटे, महेश कवठाळे, विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, विष्णू चव्हाण, गजानन क्षिरसागर, सुर्यकांत सातपुते, राहुल परसोडे, माणिक वाघ आणि दिलीप निलपत्रेवार यांच्या पथकाने केली.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026