अकोल्यात विवाहितेची आत्महत्या

अकोला हादरलं! गजानन नगरात विवाहितेची आत्महत्या;

अकोला शहरातील गजानन नगरमध्ये विवाहितेने आत्महत्या केली. हुंड्यासाठी छळाचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर केला आहे.

अकोला हादरलं! गजानन नगरात विवाहितेची आत्महत्या;

अकोला | 
अकोला शहरातील जुने शहर भागातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गजानन नगर परिसरात एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटही आढळून आली आहे. या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मृत विवाहितेचे नाव भावना घाटोळे असे असून, तिचा विवाह सुमारे ३ ते ४ वर्षांपूर्वी विशाल घाटोळे (रा. गजानन नगर, डाबकी रोड) यांच्याशी झाला होता. त्यांना अवघे १४ महिन्यांचे लहान मूल आहे.

हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
भावनाच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर सुरुवातीपासूनच हुंड्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच तिला वारंवार टोमणे मारणे, मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“आम्ही श्रीमंत आहोत, तुमच्याकडून काहीच मिळाले नाही,”
अशा शब्दांत तिचा अपमान केला जात होता, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

आत्महत्येपूर्वी वडिलांना केला फोन
घटनेच्या दिवशी (९ एप्रिल) भावनाने आपल्या वडिलांना फोन करून
“मला इथून घेऊन जा, मला खूप त्रास देत आहेत,”
अशी आर्त विनंती केली होती.
मात्र, काही तासांतच तिच्या पतीकडून “तुमच्या मुलीने गळफास घेतला” अशी माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

 सुसाइड नोटमुळे तपासाला वेग
घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे.

पोलीसांची भूमिका
डाबकी रोड पोलिसांनी या प्रकरणी मर्ग नोंद केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस निरीक्षक दीपक कोळी यांनी सांगितले की:
“मृत विवाहितेचे माहेर मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली येथे आहे. तिचे नातेवाईक सोमवारी पोलिस ठाण्यात येणार असून, त्यांच्या लेखी तक्रारीनंतर दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.”

शहरात संतापाचे वातावरण
या घटनेमुळे अकोला शहरात संताप व्यक्त केला जात असून, महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Oct 06, 2026
नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सेक्टर-९४ येथील सुपरनोव्हा सोसायटीत गुरुग्रामच्या संभव जैन या तरुणाने ४३व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Oct 03, 2026
पाऊस लांबला, विहिरी आटल्या, जनावरे दगावली आणि कर्जाचा भार वाढला!

पाऊस लांबला, विहिरी आटल्या, जनावरे दगावली आणि कर्जाचा भार वाढला!

Drought-Affected Farmers Suicides: आटलेल्या विहिरी, पशुधनाचे नुकसान आणि वाढता कर्जाचा भार अशा संकटांचा सामना करताना सोलापूर जिल्ह्यातील 18 वर्षीय तरुण शेतकरी प्रथमेश अनिल खरात याने आत्महत्या

Sep 30, 2026