हिंगोली आत्महत्याग्रस्त शेतकरी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer

हिंगोली (Hingoli Suicide-affected farmer) : दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. घरातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने वाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे.

या (Hingoli Suicide-affected farmer) दुःखद घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी आज वाढवे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व किराणा साहित्य, गहू आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

विशेष म्हणजे, विठ्ठल वाढवे यांच्या दोन मुली प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या असताना कुटुंबावर हे संकट ओढवले आहे. त्यामुळे कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत केवळ तात्पुरती मदत न करता, वाढवे कुटुंबातील मुलाच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सचिन दराडे यांनी स्वीकारली आहे. मुलाचे शिक्षण थांबू नये आणि त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च आपण उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“एका कुटुंबावर संकट आले असताना समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. आजची मदत ही केवळ किराणा किंवा धान्याची नसून, या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी दिलेला आधार आहे. मुलाच्या शिक्षणात परिस्थितीमुळे अडथळा येऊ नये, यासाठी मी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे,” अशी भावना सचिन दराडे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चोतमल उपस्थित होते. दराडे यांनी दाखविलेल्या मानवतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026