रिसोड (CBSE 10th Result) : येथील सनराईज इंग्लिश स्कूलचा सीबीएससी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या निकालात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. शाळेतील विद्यार्थी पार्थ किसनराव देशमुख (९२%), भार्गव महेश छत्रे (९१.६०%), कु. वैष्णवी विक्रांत लोखंडे (९१.४०%), विपुलकुमार विजय साबळे (९१.४०%), कु. आर्या दीपक जोशी (९०%), ईश्वर गजानन खानझोडे (८९.४०%) व चिराग राजेंद्र देशमुख (८९%), ओम भिमराव शिंदे (८९%) यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
तसेच किशोरसिंग चेनसिंग राठोड (८८.६०%), दिपक पुंजाजी घोडे (८८.२०%), वेदांत आशिष लढ्ढा (८८.२०%), वेदिका प्रकाश दांदडे (८७.४०%), शंतनू गोपाल चौधरी (८७.४०%), कल्याणी गणेश मुंढे (८६.८०%), प्रणव सतीशराव देशमुख (८६.६०%), वेदांत माधव मगर (८६.२०%), वेदांत भास्कर पारिसकर (८६.२०%), खुशी श्याम जोगदंड (८६%), सृष्टी गजानन देशमुख (८५.८०%) व अर्पिता विवेक वानखेडे (८५%) यांनीही उत्तम यश संपादन केले.
या (CBSE 10th Result) विद्यार्थ्यांपैकी कु. खुशी जोगदंड हिने मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले, तर कु. आर्या दीपक जोशी हिने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार तथा माजी मंत्री अनंतरावजी देशमुख, शाळेच्या अध्यक्षा जयश्री देशमुख, संस्थेचे विश्वस्त चैतन्य देशमुख, सचिव ॲड. नकुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाला तसेच शाळेच्या प्राचार्या रोजमेरी जोस व सर्व शिक्षकवृंद यांना दिले. शाळेच्या उत्कृष्ट निकालामुळे पालकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
रिसोडच्या सनराईज इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम; CBSE दहावीचा निकाल १००%
CBSE 10th Result: सनराईज इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १००% आला. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच करण्यात येणार.
CBSE 10th Result
संबंधित सामग्री
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली
Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू
Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा
Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश
आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी
Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.