केअरगिव्हर पदभरती

इस्रायलमध्ये ३५०० होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Caregiver Recruitment: इस्रायलमध्ये होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी ३५०० उमेदवारांची भरती. आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर करण्याच्या इच्छुकांसाठी सुवर्णसंधी. महाराष्ट्र इंटरनॅशनल पोर्टलवर नोंदणी आवश्यक.

इस्रायलमध्ये ३५०० होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Caregiver Recruitment

 

महाराष्ट्र इंटरनॅशनल पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

हिंगोली (Caregiver Recruitment) : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी ३५०० उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोग्य व सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून इच्छुकांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल https://maharashtrainternational.com⁠ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या (Caregiver Recruitment) भरती प्रक्रियेत ९० टक्के महिला व १० टक्के पुरुष उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्जदाराचे वय २५ ते ४५ वर्षे दरम्यान असावे तसेच किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची उंची किमान १.५ मीटर व वजन किमान ४५ किलो असणे गरजेचे आहे. यासोबतच इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये किमान ९९० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट अथवा मिडवायफरी यापैकी मान्यताप्राप्त डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ६४४३.८५ इस्रायली न्यू शेकेल म्हणजे अंदाजे रुपये १.९९ लाख इतके वेतन मिळणार आहे. याशिवाय नियोक्त्याकडून राहण्याची सोय, भोजन व वैद्यकीय विमा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन प्रक्रिया व व्हिडिओ मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, पालक किंवा मुले) सध्या इस्रायलमध्ये कार्यरत नसावेत. निवड प्रक्रियेसाठी पोलीस पडताळणी प्रमाणपत्र व वैद्यकीय तपासणी अनिवार्य राहील. (Caregiver Recruitment) अधिक माहितीसाठी व अर्जासाठी इच्छुकांनी संबंधित अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-३, दुसरा मजला, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बालाजी मरे यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
9/11 चा संदर्भ, विमानांना लक्ष्य करण्याची धमकी? फ्लायदुबई प्रकरणात नवा ट्विस्ट

9/11 चा संदर्भ, विमानांना लक्ष्य करण्याची धमकी? फ्लायदुबई प्रकरणात नवा ट्विस्ट

फ्लायदुबई विमानातील क्रॅश कटानंतर ओमानी को-पायलटवर गंभीर आरोप; जखमी भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी विमान सुरक्षित उतरवल्याचा दावा.

Oct 04, 2026
फ्लाय दुबई विमानात हायजॅकचा अलर्ट; भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाने संकट टळलं

फ्लाय दुबई विमानात हायजॅकचा अलर्ट; भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाने संकट टळलं

फ्लाय दुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात कॉकपिटमध्ये हल्ला; 7700 आणि 7500 अलर्टनंतर विमान सौदीतील तबूकमध्ये उतरले.

Oct 01, 2026
65 हजार 866 सरकारी पदांची भरती रखडली; उमेदवारांमध्ये असंतोष

65 हजार 866 सरकारी पदांची भरती रखडली; उमेदवारांमध्ये असंतोष

MPSC Recruitment Process: राज्यातील विविध शासकीय विभागांमधील तब्बल 65 हजार 866 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला विलंब होत आहे. अनेक विभागांकडून आवश्यक मागणीपत्रे अद्याप पूर्णपणे सादर नाही...

Sep 22, 2026
भरती परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी शिफारशी देणार: व्ही. राधा

भरती परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी शिफारशी देणार: व्ही. राधा

Government Recruitment Exams: राज्यातील शासकीय भरती परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून शासनाला शिफारशी

Sep 21, 2026