नालीचे पाणी बाटलीत भरून पंचायत समिती गाठली..
कळमनुरी (Contaminated Water Protest) : तालुक्यातील गौळबाजार येथे नालीचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत युवकांनी अनोखे आंदोलन केले. कळमनुरी तालुक्यातील गौळबाजार गावातील रस्त्यावर नालीचे दूषित पाणी वाहत असल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने संतप्त युवकांनी नालीचे पाणी बाटल्यांमध्ये भरून थेट पंचायत समिती कार्यालय गाठले. संबंधित अधिकाऱ्यांना हे (Contaminated Water Protest) दूषित पाणी दाखवत तात्काळ नाल्याची दुरुस्ती आणि रस्त्यावरील साचलेले पाणी हटविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी विश्वंभर कदम, संतोष मुद्दळ, विवेक इंगळे, श्रीकांत कदम अधि गावकऱ्यांची उपस्थिती होती.
दोन दिवसात गौळ बाजारला पथक भेट देणार
कळमनुरी तालुक्यातील गौळबाजार बाजार हे गाव हे स्मार्ट व्हिलेज मध्ये शामिल असून जर ही परिस्थिती असेल, तर गावात संबंधित धिकार्यावर कारवाई करण्यात येईल तसेच गावाची परिस्थिती पाहण्यासाठी एक पथक एक दोन दिवसात गौळ बाजारला भेट देणार तसेच गट विकास अधिकारी ना सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.