World Tribal Day

रतनवाडी येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा!

तालुक्यातील आदिवासी गाव रतनवाडी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

रतनवाडी येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा!

World Tribal Day

गुणवंत विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव; शासकीय सेवेत असलेल्या युवकांचा सत्कार

मानोरा : तालुक्यातील आदिवासी गाव रतनवाडी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव करून शासकीय सेवेत असलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. आयोजित कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आदिवासी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितींमध्ये लोकनेते स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे खंदे समर्थक ठाकुरसिंग चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक चव्हाण, माजी सरपंच मंगल चव्हाण, विजय पवार, विजय पाटील, सुरेश राठोड, सुभाष राठोड, रतनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मालकर, उपसरपंच सोनटक्के यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी ॲड. ज्ञायक पाटणी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आदिवासी समाजाचा इतिहास संघर्षाचा आहे. त्यामुळे भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन युवकांनी शिक्षण क्षेत्रात पुढे यावे. तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासोबतच आदिवासी समाजाने आपल्या परंपरा, संस्कृती व निसर्गाच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे.”

आदिवासी समाजातील युवा पिढीने शिक्षण, सामाजिक कार्य आणि कला-क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा आपले मत व्यक्त केले. या आयोजित कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026