, Poharadevi Bus Service

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

, Poharadevi Bus Service

गणेश चतुर्थीपासून मुक्काम बससेवा; भाविकांची प्रवासाची गैरसोय दूर होणार

मानोरा : गणेश चतुर्थीच्या पर्वावर बुलढाणा ते काशी पोहरादेवी अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. गणेश महाराज पोहरादेवी यांच्या पाठपुराव्याने, आगार व्यवस्थापक कल्पना शिरसाठ व विभागीय सचिव शंकर जाधव यांच्या सहकार्याने ही एसटी बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे बुलढाणा परिसरातील भाविकांना काशी पोहरादेवी येथे ये-जा करणे सोयीचे झाले आहे.

देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या काशी पोहरादेवी येथे गुरुपौर्णिमा, रामनवमी, दसरा, घटस्थापना आदी सण-उत्सवांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होते. यावेळी भाविकांना प्रवासासह विविध गैरसोयींचा सामना करावा लागतो. नंगारा भवन ही कल्पक व ऐतिहासिक वास्तू केंद्रस्थानी आल्यानंतर काशी पोहरादेवी येथे भाविकांसह पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून काशी पोहरादेवीसाठी एसटी बससेवा सुरू करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

मागील पंधरा वर्षांपासून कर्नाटक राज्यातील चिंचोली–पोहरादेवी, तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई–पोहरादेवी बससेवा सुरू आहे. मुंबई-कल्याण–पोहरादेवी ही बस मागील वर्षभरापासून वाशिमपर्यंत धावत असल्याने पुढील प्रवासासाठी भाविकांची गैरसोय होत आहे. पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नागपूर, रत्नागिरी, अमरावती आदी ठिकाणांहूनही एसटी बससेवा सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

याडी मरीयामा, संत सेवालाल महाराज, याडी सामकी माता तसेच महान तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या बंजारा समाजाच्या काशी तीर्थक्षेत्राला ये-जा करण्यासाठी बुलढाणा ते पोहरादेवी ही मुक्काम बससेवा गणेश चतुर्थीच्या दिवशी, २५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.

ही बस बुलढाणा येथून वरवंड, डोंगरखंडाळा, करवंड, उदयनगर, चिंचपूर, लाखनवाडा, आंबेटाकळी, पळशी, बाळापूर, वाडेगाव, पातूर, मेडशी, मालेगाव, वाशिम, धानोरा मार्गे पोहरादेवी येथे नियमित मुक्कामी राहणार आहे.

पोहरादेवीत एसटी डेपोची मागणी

पोहरादेवी येथे एसटी बस डेपोची निर्मिती करून बसस्थानकावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नागपूर–नांदेड धावणाऱ्या एसटी बसेस पोहरादेवी मार्गे वळवून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांतूनही येथे बससेवा सुरू करणे गरजेचे आहे.

नंगारा भवन ही वास्तू पर्यटकांना तसेच बंजारा समाजाच्या रूढी-परंपरांचे दर्शन घडविणारे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. ही वास्तू पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने येथे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी व्यक्त केली.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026