'ग्लोरी ऑफ फॉरेस्ट' मध्ये 12 जणांच्या शिकाऱ्यांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात! 

अलापल्ली वनपरिक्षेत्रातील अलापल्ली उपक्षेत्र, नेंडेर नियत क्षेत्र खंड क्र. १०  मध्ये ही घटना उघडकीस आली.

'ग्लोरी ऑफ फॉरेस्ट' मध्ये 12 जणांच्या शिकाऱ्यांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात! 

Wild Life Protection

शिकाऱ्यांकडून राज्य प्राणी शेकरू सह उडती खारुताई जप्त

गडचिरोली (Wild Life Protection) : संपूर्ण राज्यात 'ग्लोरी ऑफ फॉरेस्ट' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल्लापल्ली च्या जंगलात पशु पक्षांसह वन्य प्राण्यांची शिकार करणारी 12 जणांची टोळी वन विभागाच्या जाळ्यात अडकली असून  या टोळीकडून राज्य प्राणी शेकरू, उडणारी खार, रॉबिन पक्षी जप्त करण्यात आले आहेत.

अलापल्ली वनपरिक्षेत्रातील अलापल्ली उपक्षेत्र, नेंडेर नियत क्षेत्र खंड क्र. १०  मध्ये ही घटना उघडकीस आली. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांचे पथक गस्त घालत असतांना या टोळीचा पर्दाफास  झाला. त्यांच्याकडून ४ शेकरू, १ उडणारी खार, १ रॉबिन, १ हरियाल, ५ मोटारसायकल, मोबाईल तसेच शिकारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सर्व आरोपी एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावचे असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास आलापल्ली वन विभागातर्फे करण्यात येत असून अद्याप पर्यंत आरोपींची नावे कळू शकली नाही .

संबंधित सामग्री

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला. भामरागड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 26, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २३ सप्टेंबरपासून विदर्भात पावसाची शक्यता. २४-२५ सप्टेंबरला चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

Sep 21, 2026