रानडुकर हल्ला

जंगली डुकराचा हल्ल्यामध्ये महिला जखमी

Wild boar attack: कोरची तालुक्यात दोन घटनेनंतर जंगली डुकराने महिला लछनीबाई हेमंतकुमार उईके व दुसऱ्या घटनेत दोन पुरुष व एक महिला जखमी केले.

जंगली डुकराचा हल्ल्यामध्ये महिला जखमी

Wild boar attack

 

कोरची तालुक्यात दुसरी घटना
नांदळी ,बोडेना, जंगलामध्ये रानडुकराचा व इतर प्राण्यांचे वावर वाढला..

कोरची (Wild boar attack) : कोरची येथून 10 कि.मी.अंतरावर हेटाळकसा येथील लछनीबाई हेमंतकुमार उईके वय 26 वर्ष तालुका कोरची जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी असून सध्या कोरची तालुक्यामध्ये तेंदुलपत्ता तोडण्याचे काम सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार,  हेटळकसा येथील महिला पाहटे पासुन सात ते आठ महिला व पुरूष नांदळी जंगलामध्ये गेले होते. त्या तेंदुलपत्ता संकलनासाठी जंगल परिसरात गेले असता  दबा धरून बसलेला जंगली डुकर (Wild boar attack) यांनी महिला वर हल्ला चढवला, आरडाओरडा केल्यानंतर सोबत असलेल्या महिला पुरुषांनी धावून आले आणि रानडुकराचा पळून लावल्यामुळे महिलांचा जीव वाचला. 

त्यानंतर सोबत असलेल्या एका व्यक्तीची पिकप बोलावून तिला हेटाळकसा येते घेऊन गेले त्यानंतर तिच्या पतीने लगेच कोरची ग्रामीण रुग्णालयात मोटरसायकलने मांडुन भरती करण्यात आले. तिच्यावरती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. आशिष विटणकर कोरची यांनी उपचार केला त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी भेट दिली तसेच पोलीस विभागाने कर्मचारी सुद्धा भेट दिली .आणि तिच्याकडून बयाना नोंद घेण्यात आले.
     
तिला उजव्या डोक्यालाबाजुला, पायाला मार लागलेला आहे. चार  दिवसापूर्वी बोडेना जंगलामध्ये तेंदुलपत्ता संकलनासाठी जंगल परिसरात गेले असता त्यांच्यावर रानडुकराने प्रांण हल्ला केला.त्यामुळे दोन पुरुषांना व एक महिलांना डुकराने हल्ला (Wild boar attack) करून जखमी केला होता. ती घटना ताजी असतानाच आज दिनांक 13/5/2026 बुधवारला नऊ वाजता दरम्यान घटना घडली.आतापर्यंत कोरची तालुक्यामध्ये चौथी घटना आहे.

लछनीबाई  हेमंतकुमार उईके या महिलेला जखमी केले. त्यामुळे जंगलातील पत्ता संकलनासाठी गेल्या त्यावेळी अचानक समोर आलेल्या रानडुकराने (Wild boar attack) त्यांच्यावर झडप घातली. पान तोडणाऱ्या  पुरूष व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पंचनामे करून जखमी झालेल्या महिला पुरुषांना आर्थिक मदत देण्यात यावा अशी मागणी गावकरी लोकांनी केला आहे.

संबंधित सामग्री

अखेर पिसाळलेल्या कोल्ह्याचा बैलाच्या लाथेने मृत्यू

अखेर पिसाळलेल्या कोल्ह्याचा बैलाच्या लाथेने मृत्यू

पिसाळलेल्या कोल्ह्याने नागरिक आणि जनावरांना चावा घेतल्याने खानापूर चित्ता परिसरात भीती होती. अखेर बैलाच्या लाथेने कोल्ह्याचा मृत्यू झाला.

Sep 07, 2026
परभणीत तीन वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

परभणीत तीन वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

Stray dog ​​attack: जिंतूर  तालुक्यातील येथे मोकाट कुत्र्यांच्या झुंडाने तीन वर्षीय मुलावर हल्ला केला. यामध्ये सदर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल

Aug 11, 2026
शेतात काम करणार्‍या महिलेवर रानडुकराचा हल्ला; कुत्र्याच्या धाडसाने वाचला जीव

शेतात काम करणार्‍या महिलेवर रानडुकराचा हल्ला; कुत्र्याच्या धाडसाने वाचला जीव

Wild Boar Attack: शेतकरी अन्नपूर्णा चव्हाण यांचा रानडुकराचा अचानक हल्ल्यात जिवाची बचत कुतर्या धाडसाने झाली. तिची गंभीर जखमांवर उपचार सुरू आहेत.

Jun 28, 2026
अमरावतीत रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू; नागरिकांमध्ये संताप

अमरावतीत रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात २४ जून रोजी मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गोविंद पिंजरकर (वय ७५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

Jun 26, 2026