गिरडा  बिबट्या हल्ला

गिरडा गावात बिबट्याचा धुमाकुळ, पाच शेळ्या एका वासराचा फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Girda Leopard Attack: गिरडा गावात एक बिबट्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यात चार शेळ्या, एक बोकड आणि एक मोठ्या वासराला ठार केले. गावात अत्यंत भयभीत वातावरण निर्माण झाले.

गिरडा गावात बिबट्याचा धुमाकुळ, पाच शेळ्या एका वासराचा फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Girda Leopard Attack

बुलढाणा (Girda Leopard Attack) : तालुक्यातील गिरडा येथील गाववस्तीत शिरून एका बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यात धुमाकूळ घालत तब्बल चार शेळ्या, एक बोकड आणि एका मोठ्या वासराला ठार केल्याची थरारक घटना १४ जुलै रोजी रात्री घडल आहे. बिबट्याने आठ दिवसांपूर्वी 6 बकऱ्यांवर हल्ला केला होता. त्यामध्ये रमेश बाबूराव सोनुने यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. सतत अशा घटना घडत आहेत.

या (Girda Leopard Attack) घटनांमुळे गिरडा गावात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरडा गावच्या मध्यभागी राहणारे शेतकरी नरेंद्र नामदेव पंडीत यांच्या घराशेजारीच त्यांचा जनावरांचा गोठा आहे. १४ जुलैच्या रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने थेट गावात आणि या गोठ्यात प्रवेश केला. बिबट्याने गोठ्यातील प्राण्यांवर हल्ला चढवत ४ शेळ्या, १ बोकड आणि १ मोठे वासरू यांना जागीच ठार केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

बिबट्याने (Girda Leopard Attack) थेट गावाच्या मध्यभागी येऊन जनावरांची शिकार केल्यामुळे ग्रामस्थ अत्यंत भयभीत झाले आहेत. आज जनावरांवर झालेला हा हल्ला उद्या लहान मुले, महिला किंवा शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांवरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गावच्या बाजूला असलेल्या  झाडी-झुडपांमुळे हिंस्त्र प्राण्यांना लपायला जागा मिळते. त्यामुळे वनविभागाने या भागाची तात्काळ साफसफाई करावी आणि गावाच्या बाजूने संरक्षक जाळीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड, सरपंच सौ. सुनिता गायकवाड, योगेश गायकवाड, अशोक गायकवाड, रविन्द्र गायकवाड, ज्ञानेश्वर पोफळे, शुभम शेळके व गिरडा येथील समस्त गावकऱ्यांनी वनविभागाकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. वनविभागाने यावर तात्काळ पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरातील शिवारात वाघ किंवा बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 05, 2026
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता GPS व बायोमेट्रिकद्वारेच...

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता GPS व बायोमेट्रिकद्वारेच...

Gram Panchayat Biometric: ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांची हजेरी आता अनिवार्यपणे GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच नोंदवण्यात यावी, असे निर्देश

Aug 19, 2026
गावटी कुत्र्यांच्या हल्यात चितळ ठार

गावटी कुत्र्यांच्या हल्यात चितळ ठार

Local Dog Attack: गावटी कुतुंबाचा हल्यांत उचललेल्या चितळाचे शिकार करत असलेल्या घटनेमुळे अचानक ठार होण्याचा माहिती वनाधिकारांनी सांगितली.

Jul 05, 2026
वाघजाळीत रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

वाघजाळीत रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Wild Boar Attack: महिलांचा गट जेवणासाठी थांबला होता. मात्र उपवास असल्याने एक महिला थोडी बाजूला बसली आणि काही क्षणांतच तिच्यावर रानडुकराने जीवघेणा हल्ला चढविला.

Jun 25, 2026