रानडुकर हल्ला

वाघजाळीत रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Wild Boar Attack: महिलांचा गट जेवणासाठी थांबला होता. मात्र उपवास असल्याने एक महिला थोडी बाजूला बसली आणि काही क्षणांतच तिच्यावर रानडुकराने जीवघेणा हल्ला चढविला.

वाघजाळीत रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Wild Boar Attack

 

उपवासासाठी जेवणापासून दूर बसल्या अन् क्षणात संकट कोसळले

सेनगाव/ रिसोड (Wild Boar Attack) : शेतात हळद लागवडीचे काम सुरू होते. महिलांचा गट जेवणासाठी थांबला होता. मात्र उपवास असल्याने एक महिला थोडी बाजूला बसली आणि काही क्षणांतच तिच्यावर रानडुकराने जीवघेणा हल्ला चढविला. सेनगाव तालुक्यातील वाघजाळी शिवारात गुरुवारी दि. २५ जून सकाळी सुमारे ११ वाजता घडलेल्या या घटनेने परिसर हादरला आहे.

या (Wild Boar Attack) हल्ल्यात सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील हनीफा बी फिरोज खान पठाण वय ३२,  या  महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हनीफा बी या इतर महिलांसह शेतात हळद लागवडीचे काम करत होत्या. कामादरम्यान सर्व महिला जेवणासाठी बसल्या. मात्र, मोहर्रमचा रोजा असल्याने हनीफा बी यांनी जेवण न करता काही अंतरावर जाऊन विश्रांतीसाठी बसण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, शेतालगतच्या झुडपातून अचानक बाहेर आलेल्या रानडुकराने थेट त्यांच्यावर हल्ला केला. हा (Wild Boar Attack) हल्ला इतका अचानक होता की उपस्थित महिलांना काही क्षण काय घडले हेच समजले नाही. आरडाओरड, धावपळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक व उपस्थित महिलांनी प्रसंगावधान राखत जखमी महिलेला तातडीने रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

या (Wild Boar Attack) घटनेनंतर वाघजाळी परिसरात शेतात जाणाऱ्या महिला व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः पावसाळी हंगामात शेत परिसरात वन्य प्राण्यांचा वाढलेला वावर चिंतेचा विषय ठरत आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित सामग्री

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरातील शिवारात वाघ किंवा बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 05, 2026
गिरडा गावात बिबट्याचा धुमाकुळ, पाच शेळ्या एका वासराचा फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गिरडा गावात बिबट्याचा धुमाकुळ, पाच शेळ्या एका वासराचा फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Girda Leopard Attack: गिरडा गावात एक बिबट्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यात चार शेळ्या, एक बोकड आणि एक मोठ्या वासराला ठार केले. गावात अत्यंत भयभीत वातावरण निर्माण झाले.

Jul 15, 2026
गावटी कुत्र्यांच्या हल्यात चितळ ठार

गावटी कुत्र्यांच्या हल्यात चितळ ठार

Local Dog Attack: गावटी कुतुंबाचा हल्यांत उचललेल्या चितळाचे शिकार करत असलेल्या घटनेमुळे अचानक ठार होण्याचा माहिती वनाधिकारांनी सांगितली.

Jul 05, 2026
Father's Day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा! लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज; जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

Father's Day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा! लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज; जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने फादर्स डेच्या दिवशी पित्याच्या निस्वार्थ प्रेमाची आणि धाडसाची प्रचिती दिली.

Jun 21, 2026