Farmers Issues

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषदेतून मागणी

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यासह चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, शेतीमालाला योग्य भाव, धान खरेदी, आरोग्य सुविधा, रस्ते व महामार्ग, शेतजमिनीशी संबंधित प्रश्न, नुकसानभरपाई, कृषीविषयक प्रलंबित मागण्या तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असून, अनेक भागांमध्ये सिंचन, शेतीमालाची वाहतूक, बाजारपेठ आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविताना अडचणी निर्माण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले. अवैध बनावटी तंबाखू, गुटखा व प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर कठोर प्रतिबंध घालून प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होऊन कॅन्सरसह तंबाखूजन्य विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सध्या देण्यात येणारी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत वाढवून ५० लाख रुपये करण्यात यावी आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि भंडारा परिसरातून प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाबाबत स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. शेतकऱ्यांची जमीन, त्यांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच महामार्गाचा मार्ग निश्चित करावा. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

MIDCची जागा उपलब्ध असतानाही गेल्या १५ वर्षांत एकही मोठा उद्योग उभारला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक युवक व बेरोजगारांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत आहे. MIDC परिसरात नवीन उद्योग आणून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी नमूद केले.

या सर्व प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि शेतीशी निगडित प्रश्नांबाबत शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता संबंधित विभागांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असे यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शंतनू धोटे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नागभीड प्रमोद चौधरी, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर प्रशांत डवले, माजी जिल्हा महासचिव युवक काँग्रेस रोहन नन्नावरे, कार्याध्यक्ष चिमूर युवक काँग्रेस सजित कारेकार, विधानसभा महासचिव चिमूर कुंदन पडवेकर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली अनिल कोठारे, ओ.बी.सी. जिल्हा कार्याध्यक्ष गडचिरोली दिवाकर निसार, विपुल येलटीवार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावली प्रमोद दाजगाये, युवक विधानसभा उपाध्यक्ष चिमूर अमर नवघडे, युवराज घोटेकर, राजेंद्रनाथ मेश्राम, हरीश मुंडे, अनु. जाती. जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर चेतन खोब्रागडे, हितेश ठाकरे, पवन नवघडे, समिर कुळमेथे, शुभम कुळमेथे, दिपक ठाकरे, सचिन वाटगुरे, भगवान डाकारे, क्रिष्णा कोहपरे, रामाजी हुलके, राजेश भोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
औंढ्यात अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

औंढ्यात अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aundha illegal Gutkha Action:येथील खतीब कॉलनी भागात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा साठ्यावर औंढा नागनाथ पोलिसांनी  ५ ऑक्टोबर सोमवार रोजी कारवाई करून ४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल

Oct 05, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026