लग्न मंडपावर सोलर खांब कोसळून अपघात!

तालुक्यातील वडगाव येथे आलेल्या वादळी वाऱ्याने एका लग्न मंडपावर दि. ७ मे रोजी गावात ग्राम पंचायतने बसविलेले सोलर खांब विद्युत तारावर कोसळून पडले.

लग्न मंडपावर सोलर खांब कोसळून अपघात!

Wedding Accident

४ जण जखमी, तर २ महीला गंभीर जखमी! 

मानोरा (Wedding Accident): तालुक्यातील वडगाव येथे आलेल्या वादळी वाऱ्याने एका लग्न मंडपावर दि. ७ मे रोजी गावात ग्राम पंचायतने बसविलेले सोलर खांब विद्युत तारावर कोसळून पडल्याने विद्युत तारामुळे ४ जण जखमी झाले असुन यामध्ये सोलर खांब अंगावर पडल्याने २ महीला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असुन अनेक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

सविस्तर असे की, गुरुवार रोजी सकाळपासूनच आभाळ दाटून आले होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशातच वादळी वाऱ्याने वडगाव येथे लग्न मंडपावर ग्राम पंचायत प्रशासनाने बसविलेले सोलर खांब विद्युत तारावर  पडल्याने विद्युत तारामुळे ४ जण जखमी झाले असुन सोलर खांब लग्न मंडपात कोसळून पडल्याने २ महीला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलाना उपचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; टँकरखाली दुचाकी घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; टँकरखाली दुचाकी घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Aug 25, 2026
15 ऑगस्टपासून सुरु होणार 'कॉकरोच जनता पार्टी'ची देशव्यापी मोहीम!

15 ऑगस्टपासून सुरु होणार 'कॉकरोच जनता पार्टी'ची देशव्यापी मोहीम!

CJP School Abhiyan: गावांतील सरकारी शाळांची दयनीय अवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कॉकरोच जनता पक्षाने (CJP) एका मोठ्या मोहिमेची घोषणा

Aug 11, 2026
शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

Latur Shiv Sena: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक

Aug 06, 2026