Maharashtra Weather

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यासह विदर्भाला यलो अलर्ट

महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यासह विदर्भाला यलो अलर्ट

Maharashtra Weather

९ ऑगस्टला ३०-४० किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाट; १० ऑगस्टला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. ९ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.

रविवारी जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

यानंतर सोमवारी विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी कोणत्याही जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, राज्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पावसादरम्यान आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026