परभणी महापालिका

परभणी महापालिका विशेष सर्वसाधारण सभेत चार स्विकृत सदस्यांची निवड

Parbhani Municipal Corporation:

परभणी महापालिका विशेष सर्वसाधारण सभेत चार स्विकृत सदस्यांची निवड

Parbhani Municipal Corporation

 

उबाठाच्या अंबिका डहाळे, काँग्रेसचे विनोद कदम, राष्ट्रवादीचे शेख फहाद तर शहर आघाडीचे राहूल मुरकुटे 

परभणी (Parbhani Municipal Corporation) : महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवार ५ ऑगस्ट रोजी बी.रघुनाथ सभागृहात सकाळी ११ वाजता महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत चार स्विकृत सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विनोद कदम, अंबिका डहाळे, राहूल मुरकुटे आणि शेख फहाद शेख हमीद यांचा समावेश आहे.

परभणी शहर महापालिकेत (Parbhani Municipal Corporation) एकूण ६५ सदस्य आहेत. तर ६ स्विकृत सदस्य आहेत.  भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठासह काँग्रेसकडून स्विकृत सदस्य पदासाठी अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी आपल्या परिने फिल्डींग सुध्दा लावली होती. अखेर बुधवार ५ ऑगस्ट रोजी निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेना उबाठा गटाकडून अंबिका डहाळे, काँग्रेसकडून विनोद कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शेख फहाद शेख हमीद, शहर विकास आघाडीकडून राहूल मुरकूटे यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी महापौर सय्यद इकबाल, उप महापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर,  नगर सचिव विकास रत्नपारखी यांची उपस्थिती होती.  निवडीनंतर नवनिर्वाचित सदस्यांचा महापौर सय्यद इकबाल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या विशेष बैठकीस मनपा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

आ. डॉ. राहूल पाटील यांची खेळी यशस्वी

स्विकृत सदस्यांमध्ये दोन जागा शिवसेना उबाठा गटाच्या वाट्याला आल्या आहेत. खा. संजय जाधव हे शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे या गटातील स्विकृत सदस्याचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. बुधवारच्या सभेत आ.डॉ. पाटील गटाच्या सौ.अंबिका डहाळे यांची निवड झाली आहे.  मात्र खासदारांच्या गटातून कुणाच्या गळ्यात स्विकृत सदस्यांची माळ पडेल हे येत्या काळात स्पष्ट होईल. तुर्तास आ.डॉ. पाटील यांची स्विकृत सदस्याबाबतची खेळी यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत विरोधक आक्रमक; मनपाची सर्वसाधारण सभा वादळी होणार

परभणीत विरोधक आक्रमक; मनपाची सर्वसाधारण सभा वादळी होणार

Parbhani Municipal Corporation: शहर महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बी.रघुनाथ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

Jul 27, 2026
परभणी मनपा स्वीकृत सदस्यपदासाठी अंबिका डहाळे, विनोद कदम यांचे अर्ज दाखल; पाच जागांसाठी अर्जांची प्रक्रिया पूर्ण

परभणी मनपा स्वीकृत सदस्यपदासाठी अंबिका डहाळे, विनोद कदम यांचे अर्ज दाखल; पाच जागांसाठी अर्जांची प्रक्रिया पूर्ण

स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी निश्चित करण्यात आली होती.

Jun 30, 2026
पातुर नगरपरिषद निवडणूक: अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षांचे शक्तीप्रदर्शन

पातुर नगरपरिषद निवडणूक: अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षांचे शक्तीप्रदर्शन

Patur Municipal Council: पातुर नगरपरिषद निवडणुकीत अंतिम दिवशी विविध राजकीय पक्षांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे

May 26, 2026