Weather Alert

मुंबईसह ठाण्यात पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा रेड अलर्ट

राज्यातील अनेक भागांसह मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे.

मुंबईसह ठाण्यात पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा रेड अलर्ट

Weather Alert

रत्नागिरीतही रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट, सखल भाग जलमय

मुंबई (Weather Alert) : राज्यातील अनेक भागांसह मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात पावसाच्या संततधार सुरू असून, हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यातील काही भागांमध्ये पुढील २४ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, मुंबईसाठी तीन तासांचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत रेड अलर्ट लागू राहणार असून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत उर्वरित काळासाठी ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, पुढील ७२ तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवरही झाला आहे. गोरेगाव फिल्म सिटी रोडवरील संतोष नगर परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शाळेच्या वेळेतच रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे.

मालाड सबवेमध्ये सुमारे एक फूट पाणी साचल्यामुळे मालाड पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याशिवाय, सबवेबाहेरील मुख्य नाल्याचे लोखंडी झाकण तुटल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

ठाणे शहरातही मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव आणि कोपरी बारा बंगला परिसरात पाणी साचले असून, महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह या भागांची पाहणी केली.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही सखल भागांमध्ये पाणी साचले असून, रानशेत आणि दाभोण परिसरातून वाहणाऱ्या सुसरी नदीला मोठा पूर आला आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरत असल्याचे चित्र आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

Sep 28, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026