धोतरा शिवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या रोहीचा विहिरीत पडून मृत्यू

हिंगोली तालुक्यातील खेर्डा गावाजवळील धोतरा शिवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या रोहीचा शनिवार, १६ मे रोजी विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

धोतरा शिवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या रोहीचा विहिरीत पडून मृत्यू

Water Scarcity

खेर्डा (Water Scarcity) : हिंगोली तालुक्यातील खेर्डा गावाजवळील धोतरा शिवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या रोहीचा शनिवार, १६ मे रोजी विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वनविभागाचे कर्मचारी व गावकऱ्यांच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

हिंगोली तालुक्यातील धोतरा परिसरात शेतशिवारातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून नदी-नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील माळरान क्षेत्रात राहणारे वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करत आहेत. अशाच एका कळपापासून वेगळा पडलेला रोही पाण्याच्या शोधार्थ धोत्रा परिसरात आला होता.

शेतशिवारात पाणी न मिळाल्याने रोहीने गावाकडे धाव घेतली. गावाजवळ जुगल मुंदडा यांच्या विहिरीमध्ये तो पडला. याची माहिती मिळताच मुंदडा यांनी माजी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांना कळवले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली.

वनरक्षक उबाळे व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. माजी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण तसेच गावकरी ज्ञानेश्वर उल्हास चव्हाण, निर्गुण चव्हाण, पप्पू चव्हाण, गजानन शेळके, जीजुबा चव्हाण यांच्या मदतीने विहिरीत पडलेला रोही बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, धोतरा परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यामध्ये वनविभागाने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

Hingoli Water Scarcity Plan: जिल्हा परिषदेच्या सभागृहात ५ ऑक्टोबर सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026