Warkari Accident

पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या जीपला भीषण अपघात; बीडमध्ये एकाचा मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

आषाढी एकादशीची पंढरपूर वारी पूर्ण करून वाशिमकडे परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे.

पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या जीपला भीषण अपघात; बीडमध्ये एकाचा मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Warkari Accident

केज-कळंब रस्त्यावरील साळेगावजवळ जीप, ट्रॅक्टर आणि कारची जोरदार धडक; कळंब व अंबाजोगाई येथील रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू

आषाढी एकादशीची पंढरपूर वारी पूर्ण करून वाशिमकडे परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. बीड जिल्ह्यातील केज-कळंब मार्गावरील साळेगावजवळ जीप, ट्रॅक्टर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, पंढरपूर येथील वारी आटोपल्यानंतर वारकरी जीपमधून वाशिमकडे निघाले होते. दरम्यान, बीड जिल्ह्यातील साळेगाव परिसरात जीप, ट्रॅक्टर आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वारकऱ्यांना गंभीर दुखापती झाल्या.

अपघाताचा आवाज परिसरात घुमल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकांच्या साहाय्याने जवळच्या कळंब आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेत एका वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026
वाशिम जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत शस्त्र प्रदर्शनावर बंदी!

वाशिम जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत शस्त्र प्रदर्शनावर बंदी!

Washim Ganesh Visarjan: वाशिम जिल्हयात दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश स्थापना झाली असून २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सार्वजनिकरित्या मिरवणुका काढून विसर्जन

Sep 24, 2026