नागपूरसह पूर्व विदर्भात बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम; हवामानात बदल

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या हवामानात बदल झाला असून तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.

नागपूरसह पूर्व विदर्भात बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम; हवामानात बदल

Vidarbha Weather Alert

नागपूर (Vidarbha Weather Alert) : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या हवामानात बदल झाला असून तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. पूर्व विदर्भासह नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या बदलामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान १ ते ३ अंशांनी घटले असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पूर्वमोसमी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून पुढील काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, या अवकाळी पावसानंतर पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित सामग्री

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026
शेतकऱ्यांची चिंता वाढली! विदर्भात पावसाचा जोर कमी; अमरावती-गोंदियाचा ऑरेंज अलर्ट रद्द

शेतकऱ्यांची चिंता वाढली! विदर्भात पावसाचा जोर कमी; अमरावती-गोंदियाचा ऑरेंज अलर्ट रद्द

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे.

Sep 03, 2026
महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट? ऑगस्ट सर्वात कोरडा महिना; सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का? 

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट? ऑगस्ट सर्वात कोरडा महिना; सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का? 

Maharashtra Monsoon Update: जुलैमध्ये मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर अचानक कमी झाला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्याच्या पावसाची आकडेवारी पाहता ऑगस्ट कोरडा.

Sep 02, 2026
पावसाचा जोर वाढणार! राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

पावसाचा जोर वाढणार! राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

मुंबई राज्यातील पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Aug 25, 2026
Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुणे-सातारा घाटमाथ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुणे-सातारा घाटमाथ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेग तुलनेने कमी झालेला असला, तरी आता पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

Aug 24, 2026