कांद्री घरफोडी प्रकरण

कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

Kandri Burglary Case: पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार

कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने  व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

Kandri Burglary Case

कन्हान (Kandri Burglary Case) : पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
           
प्राप्त माहितीनुसार, मंगेश गजानन वंजारी वय ३८ वर्ष रा. वार्ड क्र. ५, कांद्री- कन्हान हे डाटा अँनालि सिसचे काम करतात. शनिवार (दि.१५) ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान मंगेश आपल्या कुटुंबासह घराला कूलुप लावुन नागपुर येथील सासुरवाडीला गेले होते. दरम्यान रविवार (दि.१६) ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता दरम्यान त्यांना मेघा वंजारी यांनी फोन करून घराचे कूलुप तुटले असल्याची माहिती दिली. त्यानंतर मंगेश वंजारी घरी परतले असता घराचे कूलुप तुटलेले दिसुन आले.

घरातील बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. (Kandri Burglary Case) कपाटाची पाहणी केली असता, त्यामध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गोफ, अंदाजे किंमत ८० हजार रुपये, तसेच ८० हजार रुपये रोख असा एकुण अंदाजे १ लाख ६० हजार रुप यांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी शनिवार (दि.१५) ऑगस्ट च्या रात्री ८ वाजेपासुन रविवार (दि.१६) ऑगस्ट रोजी दुपा री १२ वाजे पर्यंतच्या कालावधीत घरात प्रवेश करून चोरी केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

घरातील आणखी काही वस्तु चोरीला गेल्याचा संशय असुन त्याबाबतची माहिती व कागदपत्रे तपासुन पुढे पोलिसांना देण्यात येणार असल्याचे तक्रारदाराने सांगितले. या (Kandri Burglary Case) प्रकरणी कन्हान पोलीसांनी मंगेश वंजारीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन आरोपीचा शोध घेत आहे .

संबंधित सामग्री

परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले.

Aug 28, 2026
कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

Kandri Burglary Case: कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे

Aug 10, 2026
परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body: मानवत  तालुक्यातील रूढी शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३४ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 09, 2026
पुणे वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार करून 22 तोळे सोन्याची लूट; जबड्यात गोळी लागून व्यावसायिक गंभीर जखमी

पुणे वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार करून 22 तोळे सोन्याची लूट; जबड्यात गोळी लागून व्यावसायिक गंभीर जखमी

पुण्यातील वाघोली परिसरात व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aug 06, 2026
पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

Parda Murder Case: पारडा तालुक्यातील बळीराम व कलावतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींना अटक केली गेली. गुन्ह्यावरून पोलिसांनी काही मुख्य आरोपींना अटक करण्याचा निर्णय

Jul 05, 2026