Gold Robbery

पुणे वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार करून 22 तोळे सोन्याची लूट; जबड्यात गोळी लागून व्यावसायिक गंभीर जखमी

पुण्यातील वाघोली परिसरात व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार करून 22 तोळे सोन्याची लूट; जबड्यात गोळी लागून व्यावसायिक गंभीर जखमी

Gold Robbery

गावडेवाडी-शिरसवडी रस्त्यावर थरार; तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा, वापरलेल्या दोन दुचाकींपैकी एक चोरीची असल्याची माहिती

पुण्यातील वाघोली परिसरात व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावडेवाडी-शिरसवडी रस्त्यावर तिघा अज्ञात आरोपींनी कार अडवून गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाले असून, त्यानंतर त्यांच्या अंगावरील सुमारे 22 तोळे सोन्याचे दागिने लुटून आरोपी फरार झाले. या प्रकरणाचा तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष ज्ञानोबा गावडे (वय 50, रा. गावडेवाडी, शिरसवडी, ता. हवेली) हे मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास कारने आपल्या घरी जात होते. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांची कार अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गावडे यांच्या जबड्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतील गावडे यांच्या अंगावरील सुमारे 22 तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत 11 लाख रुपये आहे, जबरदस्तीने हिसकावून नेले. मात्र त्यांच्या हातातील सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे कडे आरोपींना काढता आले नाहीत. त्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले.

प्राथमिक तपासात या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकींपैकी एक दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींचा शोध सुरू असून या घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात 1,801 चॅट्सचा डेटा, 11 डिलीट WhatsApp चॅट्स आणि लोहगडवरील फोटोंचा तपास; 5,053 पानी आरोपपत्रात डिजिटल पुरावे.

Oct 03, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
वाघोलीत घरफोडी; रात्री घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड लंपास

वाघोलीत घरफोडी; रात्री घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड लंपास

Wagholi Burglary case: वाघोली येथे अज्ञात चोरट्याने घराच्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार ४०० रुपया..

Oct 01, 2026