कन्हान (Kandri Burglary Case) : कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने व चांदीच्या वस्तुंसह १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चोरीला गेले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी लता गणेश नगरकर वय ५२ वर्ष, रा. सुखदेव कॉलोनी कांद्री-कन्हान या सध्या आपल्या मुलासोबत मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील वैढण येथे राहत असुन अधुनमधुन कांद्री येथील घरी येत असतात. त्यांच्या कांद्री येथील घराची देखरेख अरविंद गोकुल प्रसाद वय ३१ वर्ष, रा. कोळ सा खदान क्र. ३ हे करीत असल्याचे तक्रारीत नमुद आहे. बुधवार (दि.५) ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता फिर्यादी घरातुन बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर शुक्रवार (दि.७) ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता घराची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मुलाला फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. या नंतर शनिवार (दि.८) ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता फिर्यादी कांद्री येथील घरी पोहोचल्या असता घराचे मुख्य कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमचेही कुलूप तोडल्याचे दिसुन आले. बेडरूमम धील लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करण्यात आले होते.
गोदरेज कंपनीच्या लॉकरची तपासणी केली असता, लॉकरच गायब असल्याचे निदर्शना स आले. चोरी गेलेल्या मुद्देमाला मध्ये सुमारे १ किलो ३४४ ग्रॅम चांदीचे दागिने व विविध चांदीच्या वस्तु , तसेच १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चा समावेश आहे. चोरी गेलेल्या चांदीच्या वस्तूंची अंदाजे किंमत १९ हजार रुपये, तर सोन्याच्या बिस्किटाची अंदाजे किंमत ७९ हजार रुपये असा एकुण सुमारे ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे. (Kandri Burglary Case) दरम्यान चोरी गेलेला लॉकर घराच्या मागील बाजुस असलेल्या वेकोलि रोडलगतच्या नाल्यात तुटलेल्या अवस्थेत व रिकामे मिळुन आल्याचेही तक्रा रीत नमुद आहे. बुधवार (दि.५) ऑगस्ट रोजी सायंका ळी ७ वाजेपासुन ते शुक्रवार (दि.७) ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजे पर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने घरात बेकायदेशीर प्रवेश करून चोरी केली. या (Kandri Burglary Case) प्रकरणी कन्हान पोलीसांनी लता नगरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपा स पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शना त कन्हान पोलीस करीत आहे .
कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी
Kandri Burglary Case: कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे
Kandri Burglary Case
संबंधित सामग्री
ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले
ऑनलाइन गेमिंगमध्ये ३५ ते ४० लाख रुपये गमावल्यानंतर तरुणाने नातेवाईकाच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप; जेसीबी परस्पर विकल्याचाही दावा.
हिंगोली जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला; चोर्यांचे सत्र सुरूच
Hingoli district theft: जिल्ह्यात लागोपाठ अनेक ठिकाणी चोर्यांचे सत्र सुरूच आहे. कधी चारचाकी तर कधी दुचाकी वाहनासह घरफोडी, जबरी चोरीच्या घटना घडतच चालल्या आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले
वसमत येथील पंचशील नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाला चोरांची भीती दाखवून व पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याची घटना शुक्रवारी घडली.
कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास
Kandri Burglary Case: पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार
चिखली बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचा गोफ लांबवणारा चोरटा जेरबंद; डी.बी. पथकाची बीडमध्ये धाडसी कारवाई
Chikhli Bus Stand Theft Case: चिखली बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन एका ८० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ आणि ओम चोरणाऱ्या आरोपीला चिखली पोलिस