हिंगोली (Debt-Waiver Tractor Rally) : शेतकर्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी या मागणी करिता मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जून रोजी ट्रॅक्टर रॅली काढली जाणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी हिंगोलीत बोलतांना दिली. हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांची १४ जून रोजी बैठक घेण्यात आली. त्यानंतर विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना शासनाची ही कर्जमाफी नसून प्रत्यक्षात कर्ज वसूली योजना आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटी शिवाय कर्ज मुक्ती केली होती. या (Debt-Waiver Tractor Rally) सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळले नाही. संपुर्ण कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकारी कार्यालयावर तर छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालयावर १६ जून रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती आ. दानवे यांनी दिली.