महसूल सेवा समाधान शिबिर

रिसोडमध्ये 'महसूल सेवा समाधान शिबिर' संपन्न; एकाच छताखाली २४६४ दाखल्यांचे वाटप

Mahsul Seva Samadhan: शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या विविध ३० स्टॉल्सवरून २,४६४ दाखल्यांचे तात्काळ वाटप करण्यात आले, तसेच नागरिकांच्या अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

रिसोडमध्ये 'महसूल सेवा समाधान शिबिर' संपन्न; एकाच छताखाली २४६४ दाखल्यांचे वाटप

रिसोड (Mahsul Seva Samadhan) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल सेवा समाधान शिबिर' रिसोड येथे मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या विविध ३० स्टॉल्सवरून २,४६४ दाखल्यांचे तात्काळ वाटप करण्यात आले, तसेच नागरिकांच्या अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

​एकाच छताखाली विविध सेवांचा लाभ

-शिबिरामध्ये उभारण्यात आलेल्या विविध ३० शासकीय स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांना खालील सेवा पुरवण्यात आल्या
-उत्पन्न, जात, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक दाखले. जमीन अभिलेख, फेरफार नोंदी, ई-पीक नोंदणी.
​-पीक कर्जासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांचे संकलन व मार्गदर्शन.
​-तक्रार निवारण विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे अर्ज व तक्रारी स्वीकारून त्यावर तत्काळ कार्यवाही केली.

या (Mahsul Seva Samadhan) शिबीराचा शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. विशेषतः शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या मार्गदर्शन स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळाला. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे हे होते. ​प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमित झनक, आमदार भावनाताई गवळी, आमदार किरणराव सरनाईक, ॲड. नकुलदादा देशमुख, अमृताताई देशमुख, नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर. ​प्रशासकीय अधिकारी: उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
​
नागरिकांकडून समाधान व्यक्त
​शासकीय सेवा नागरिकांपर्यंत सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारच्या सेवा शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. ​सूत्रसंचालन शिवकन्या कोतिवार व स्वप्नील धांडे यांनी केले तर  आभार प्रदर्शन विनोद घुगे यांनी केले

संबंधित सामग्री

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; चिपळूणचा मंडळ अधिकारी ACBच्या जाळ्यात

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; चिपळूणचा मंडळ अधिकारी ACBच्या जाळ्यात

सातबारा उताऱ्यात फेरफार करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यावर रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

Sep 03, 2026
कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kalamnuri Land Records Office: कळमनुरी पोलिस ठाण्यात चार जणांना गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सर्वांना शिवीगाळ करून शिरस्तेदारांना शासकीय कामांच्या अडचणीत भूमिका घेतली गेली.

Aug 25, 2026
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी तहसील कार्यालयास भेट

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी तहसील कार्यालयास भेट

Collector Rahul Gupta: कळमनुरी तहसील कार्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज भेट देऊन तहसीलस्तरावरील महसूल प्रशासनासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

Aug 18, 2026
स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांच्या तक्रारींसाठी महावितरणचे तक्रार निवारण केंद्र सुरू

स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांच्या तक्रारींसाठी महावितरणचे तक्रार निवारण केंद्र सुरू

Hingoli Smart Meter: हिंगोलीतील ग्राहकांच्या कळून मिळालेल्या स्मार्ट मीटर वाढीव वीज बिलांबाबत तात्काळ तक्रारांचा निपटारा करण्यासाठी महावितरण विभागाने विशेष केंद्र सुरू केले.

Aug 14, 2026
लातूर महापालिकेत 'आंधळ्या कोशिंबिरी'चा खेळ!

लातूर महापालिकेत 'आंधळ्या कोशिंबिरी'चा खेळ!

Latur Municipal Corporation: शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या लातूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून 'आंधळ्या कोशिंबिरी'चा खेळ खेळला जात आहे.

Aug 12, 2026