उदगीर (Misuse of foreign funds) : लातूर जिल्ह्य़ातील उदगीर येथून परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहारात कथित गैर व्यावहार करून तब्बल २ हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांच्या निधीच्या व्यवहारास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याच्या आरोपाने उदगीरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी श्याम शिवप्रसाद कलानी (रा. न्यू मोंढा रोड, उदगीर) यांना सोमवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी उदगीर न्यायालयात हजर करण्यात आले आसता न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या (Misuse of foreign funds) प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह संबंधित १६ कंपन्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक भगिरथी पवार यांनी दिली.उदगीर शहर पोलीस ठाण्यात दि. २१ ऑगस्ट रोजी दीपक कुमार, उपआयकर संचालक, युनिट-१, औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ३६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), २३४, २२९ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने संबंधित १६ कंपन्यांशी संगनमत करून परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहाराबाबत कथित खोटी प्रमाणपत्रे दिली आणि त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी परदेशात पाठविण्यास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या (Misuse of foreign funds) प्रकरणात २ हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांच्या निधीच्या व्यवहारास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या व्यवहारामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, संबंधित आर्थिक व्यवहारांची साखळी, कंपन्यांची भूमिका आणि कागदपत्रांची सत्यता तपासण्याचे आव्हान आर्थिक गुन्हे शाखेसमोर आहे. या प्रकरणाचा तपास लातूर आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, तपासाची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक भगिरथी पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.
आरोपीला मिळालेल्या पोलीस कोठडीत या कथित २,१४३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात? या व्यवहारात आणखी कोणाची भूमिका आहे का? कथित प्रमाणपत्रांच्या आधारे निधीची नेमकी कोणत्या मार्गाने हालचाल झाली? या प्रश्नांची उत्तरे आता पुढील तपासातून समोर येणार आहेत.उदगीरमध्ये या कथित २,१४३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने मोठी खळबळ उडाली असून, नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत होणाऱ्या चौकशीत या प्रकरणातील आणखी कोणते धक्कादायक तथ्य समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
२,१४३ कोटींच्या परदेशी निधी गैर व्यवहारातील ‘आरोपीला ९ दिवसाची पोलीस कोठडी
Misuse of foreign funds: लातूर जिल्ह्य़ातील उदगीर येथून परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहारात कथित गैर व्यावहार करून तब्बल २ हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांच्या निधीच्या व्यवहार
Misuse of foreign funds
संबंधित सामग्री
संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.
ग्रामपंचायत वापटामध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेचा आरोप
Gram Panchayat Financial Irregularity: तालुक्यातील गट ग्रामपंचायत वापटा, हट्टी मध्ये सन १ ऑक्टोबर २०२२ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील विविध विकास कामे, शासकीय निधीचा वापर, शासकीय योजना
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले
बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई झाली आहे. १० वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा मुद्दा असून, निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे पाटील म्हणाले.
लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर!
Latur District Drought: लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) दिशा समितीच्या बैठक...
लातूर गॅझेटीअरमधील आडनावांनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या : मराठा क्रांती मोर्चा
लातूर गॅझेटिअरमध्ये नमूद आडनावांनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. याबाबत लातूर जिल्हाधिकारी अशोक बास्टेवाड यांना निवेदन देण्यात आले.