सामाजिक समता सप्ताहांतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी

त आज ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता नांदेड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सामाजिक समता सप्ताहांतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी

Tribute Ceremony

नांदेड (Tribute Ceremony) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत आज ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता नांदेड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक व समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा देत जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या महान कार्याची माहिती दिली.  त्यानंतर समाज कल्याण कार्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिमराव हाटकर (सामाजिक कार्यकर्ते), राज गोडबोले (सामाजिक कार्यकर्ते), संभाजी कांबळे (दै. सम्राट प्रतिनिधी) व गजानन नरवाडे (समाज कल्याण अधिकारी) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मुख्य वक्ते डॉ. भिमराव हाटकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सामूहिक संविधान वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पापंटवार (तालुका समन्वयक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन नरवाडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यानंतर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अशोक नगर, नांदेड येथील नवबौद्ध वस्तीत स्वच्छता अभियान राबविले.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

Sep 15, 2026
वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

नांदेड शहरातील फुले मार्केट परिसरात वेलनेस स्पा सेंटरच्या आड सुरू असल्याचा आरोप असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Sep 05, 2026
नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

Aug 21, 2026