SET Exam 2026

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

MPSC, UPSC, CTET आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; परीक्षार्थी मात्र वारंवार तारीख बदलल्याने संतप्त

पुणे : सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी ४१ वी सेट परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षेच्या वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने पुणे विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागामार्फत ही परीक्षा घेतली जाते. उमेदवारांच्या हिताचा तसेच परीक्षा आयोजनातील सोयीचा विचार करून परीक्षेची तारीख बदलण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी तीन वेळा बदलले वेळापत्रक

मूळ नियोजनानुसार ४१ वी सेट परीक्षा २६ जुलै रोजी होणार होती. मात्र, एमपीएससी परीक्षा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून ६ सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले.

यानंतर त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची CTET परीक्षा होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा बदल करून सेट परीक्षा २७ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.

मात्र, आता २७ सप्टेंबरची तारीखही बदलण्यात आली असून परीक्षा २५ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांचाही परिणाम

२७ सप्टेंबरच्या आसपास केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) तसेच अन्य स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्याचबरोबर २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने अनेक उमेदवारांना प्रवास करून परीक्षा केंद्र गाठताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.

या बाबी लक्षात घेऊन सेट परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करणारी निवेदने पुणे विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. या निवेदनांचा विचार केल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी घेण्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, वारंवार परीक्षा तारीख बदलत असल्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांचा नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला असून, तिसऱ्यांदा वेळापत्रक बदलल्याने परीक्षार्थींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Sep 29, 2026