दुचाकी व दूध डेरी टेम्पोच्या भीषण अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी 

दूध डेरी टेम्पो व विना नंबरच्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोघेजण झाल्याची घटना  1 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान घडली आहे. 

दुचाकी व दूध डेरी टेम्पोच्या भीषण अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी 

Traffic Collision​​​​​​​

औंढा नागनाथ (Traffic Collision) : औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ शहराजवळील खंडेश्वरी मंदिरा जवळ भरधाव दूध डेरी टेम्पो व विना नंबरच्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोघेजण झाल्याची घटना 1 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान घडली आहे. 

या भीषण अपघातात शिवम हरिभाऊ चौरे वय पंचवीस वर्षे राहणार पिंपळा तालुका वसमत यांचा मृत्यू झाला तर प्रदीप दत्तराव सवंडकर वय 20 वर्ष राहणार टेंभुर्णी तालुका वसमत, अमजदखा शरीफखा पठाण वय 19 वर्षे राहणार कातनेश्वर हे गंभीर जखमी झाले.भरधाव दूध डेरी टेम्पो क्रमांक एम एच 38 एक्स 4491 हा औंढा नागनाथ कडे येत होता तर विना क्रमांकाच्या दुचाकी वर युवक औंढा नागनाथ कडून वसमत कडे जात असताना खांडेश्वरी देवी मंदिराजवळ हा भीषण अपघात घडला. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस पोलीस अंमलदार ओंकारेश्वर रांजणेकर हे एमसीआर झालेल्या आरोपींना परभणी कारागृहात सोडून वापस येत असताना अपघात घडल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ माहिती औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे यांना दिली व तत्काळ 108 वरून रुग्णवाहिकेस फोन लावला तर यानंतर पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार वसीम पठाण, अमलदार ओंकारेश्वर रांजणेकर, माधव सूर्यवंशी, बबन चव्हाण, संतोष धनवे, माधव लोंढे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे औंढा नागनाथ रुग्णालयात दाखल केले दरम्यान या अपघातात शिवम हरिभाऊ चौरे वय 25 वर्षे राहणार पिंपळा यांचा मृत्यू झाला अपघात प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित सामग्री

औंढा नागनाथ येथे चारा टंचाई निवारणासाठी आढावा बैठक संपन्न 

औंढा नागनाथ येथे चारा टंचाई निवारणासाठी आढावा बैठक संपन्न 

Aundha Nagnath Fodder Scarcity Relief: आगामी काळातील संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी आणि पशुधनासाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे आज जिल्हा परिषद..

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026
औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oct 02, 2026