Tractor Accident

मौशी येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू; शेतात नांगरणीदरम्यान घडली दुर्घटना

कुरखेडा तालुक्यातील मौशी येथे शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १० जुलै) सायंकाळी सुमारे ४ वाजता घडली.

मौशी येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू; शेतात नांगरणीदरम्यान घडली दुर्घटना

Tractor Accident

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील मौशी येथे शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १० जुलै) सायंकाळी सुमारे ४ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक जीवन कोडाप (वय ३०, रा. मौशी) हे स्वतःच्या शेतात एमएच-३५ एजी-७९५८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत होते. यावेळी ट्रॅक्टर चिखलात/खड्ड्यात अडकल्याने तो बाहेर काढण्यासाठी चालकाने लाकडी ओंडका (बंधी) लावून प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सुरू असतानाच ट्रॅक्टरचा तोल जाऊन तो अचानक पलटी झाला.

या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून विवेक कोडाप यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे मौशी गावात शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

Hingoli farmer death: जिल्ह्यात दुष्काळी  परिस्थिती निर्माण झाल्याने हतबल  झालेल्या ७ शेतकर्‍यांनी अवघ्या  २० दिवसात आत्महत्या करून जीवनयात्रा  संपविण्याची घटना घडली  आहे.

Sep 27, 2026
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला. भामरागड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 26, 2026
ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोलीच्या ईसापूर रमणा येथे ५० वर्षीय शेतकरी विठ्ठल वाढवे यांची आत्महत्या; नापिकी, दुष्काळ, कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता असल्याची माहिती.

Sep 26, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026