हिंगोली (Hingoli farmer death) : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने हतबल झालेल्या ७ शेतकर्यांनी अवघ्या २० दिवसात आत्महत्या करून जीवनयात्रा संपविण्याची घटना घडली आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटूंबावर संकट कोसळले आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. पुर्वी जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असताना पीक वाढीसाठी पावसाची नितांत गरज होती. अशावेळी पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनसह इतर शेती-पिकाचे नुकसान झाले आहे. डोळ्या-समोर होणारे नुकसान पाहून अनेक शेतकरी कुटूंबिय हतबल झाले. शासनाने दुष्काळी जिल्हा जाहिर करावा अशी मागणी अनेक राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांनी केली. २६ सप्टेंबर रोजी शासनाने राज्यातील जाहिर केलेल्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्याचा समावेश आहे. ऐकीकडे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर केला असताना शेतकर्यांना अर्थसहाय्य देखील दिवाळीपूर्वी द्यावे अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अवघ्या २० दिवसात जिल्ह्यात सात शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील कमलबाई कांदे, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गितेश सोमवारे, कुरुंदा येथील विलास विश्वनाथ गुळगुळे, हिंगोली तालुक्यातील इसापूर रमणा येथील विठ्ठल फकिरा वाढवे, कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील शेतकरी दत्तराव घुगे, वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गंगाधर शंकरराव ढोरे,हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील राजेश सुर्यभान जाधव यांचा समावेश आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबियांना शासनाची आर्थिक मदत तात्काळ मिळावी याकरीता महसूल-मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
हिंगोली शेतकरी मृत्यू
हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्यांचा मृत्यू
Hingoli farmer death: जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने हतबल झालेल्या ७ शेतकर्यांनी अवघ्या २० दिवसात आत्महत्या करून जीवनयात्रा संपविण्याची घटना घडली आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli farmer death
टैग्स:
Hingoli farmer death