तिरुपती-अकोला एक्स्प्रेस

तिरुपती-अकोला साप्ताहिक एक्स्प्रेसला हिरवा झेंडा; 8 मे पासून कायमस्वरूपी धावणार

Tirupati-Akola Express: तिरुपती-अकोला-तिरुपती साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी धावण्याची मंजुरी मिळाली. 8 मे 2026 पासून तिरुपतीहून दर शुक्रवारी धावणार आहे.

तिरुपती-अकोला साप्ताहिक एक्स्प्रेसला हिरवा झेंडा; 8 मे पासून कायमस्वरूपी धावणार

Tirupati-Akola Express

हिंगोली (Tirupati-Akola Express) : मराठवाड्यातील भाविकांसाठी खूशखबर. तिरुपती-अकोला-तिरुपती मार्गावर धावणारी विशेष रेल्वेगाडी क्रमांक 07605/06 आता कायमस्वरूपी करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीला नवीन क्रमांक 17429/30 देऊन साप्ताहिक एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. 

रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आज जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीझ (PR No. 64) नुसार, गाडी क्रमांक 17429 तिरुपती-अकोला एक्स्प्रेस दिनांक 8 मे 2026 पासून दर शुक्रवारी तिरुपतीहून दुपारी 12.25 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 2.00 वाजता अकोला येथे पोहोचेल. परतीच्या मार्गावर गाडी क्रमांक 17430 अकोला-तिरुपती एक्स्प्रेस 3 मे 2026 पासून दर रविवारी सकाळी 8.10 वाजता अकोल्याहून सुटून सोमवारी सकाळी 8.30 वाजता तिरुपतीला पोहोचेल.

हिंगोली, वाशिमकरांना थेट फायदा

ही (Tirupati-Akola Express) गाडी काचीगुडा, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली डेक्कन व वाशिम मार्गे धावणार आहे. आतापर्यंत या भागातील प्रवाशांना तिरुपतीला जाण्यासाठी हैदराबाद किंवा इतर ठिकाणी जावे लागत होते. आता थेट सेवा सुरू झाल्याने तिरुमला दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांची मोठी सोय होणार आहे. व्यापारी व विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होईल.

वेळापत्रक असे
तिरुपतीहून निघणारी गाडी हिंगोली डेक्कन स्थानकावर सकाळी 10.59 वाजता पोहोचून 11.00 वाजता पुढे निघेल. तर अकोल्याहून येणारी गाडी सकाळी 9.54 वाजता हिंगोलीत येऊन 9.55 वाजता तिरुपतीकडे रवाना होईल.

चार प्रकारचे डबे
या (Tirupati-Akola Express) गाडीला वातानुकूलित द्वितीय श्रेणी (2A), वातानुकूलित तृतीय श्रेणी (3A), शयनयान व जनरल सेकंड क्लासचे डबे असतील. लवकरच या गाडीचे आरक्षण IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. 

गाडीचे वेळापत्रक
*17429 तिरुपती-अकोला*    *शुक्रवार*    *दु. 12.25 सुटेल*
*17430 अकोला-तिरुपती*    *रविवार*    *स. 8.10 सुटेल*


अधिक माहितीसाठी प्रवाशांनी 139 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या 10.86 किमी दुपदरीकरणाला मंजुरी. 497 कोटींच्या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्या आणि मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे.

Sep 18, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाने सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका उभारण्यास मंजुरी दिली आहे. दिल्ली-मुंबई, कोलकाता-दिल्ली, चेन्नई-कोलकाता आणि मुंबई-चेन्नई मार्गांचाही विस्तार केला जाणार आहे

Sep 09, 2026
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू; प्रत्यक्षदर्शी नसला तरी भरपाई नाकारता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू; प्रत्यक्षदर्शी नसला तरी भरपाई नाकारता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या अपघाताच्या भरपाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. रे

Aug 21, 2026
मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध कारवाई

मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध कारवाई

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) कडून दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत पोस्ट मलकापूर येथे अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली.

Aug 21, 2026