मांजरा साखर कारखान्याकडून गळीत हंगाम 2025-26 मधील उसाला प्रति मेट्रिक टन १०० रुपयांचा दुसरा हप्ता खात्यावर जमा

कारखान्याने गळीत हंगाम 2025-26 मध्ये 7,15,409.410 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून 5,88,540 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

मांजरा साखर कारखान्याकडून गळीत हंगाम 2025-26 मधील उसाला प्रति मेट्रिक टन १०० रुपयांचा दुसरा हप्ता खात्यावर जमा

Sugar Factory

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी गोड बातमी

लातूर (Sugar Factory) : राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील दीपस्तंभ आणि देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या लातूर तालुक्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.

कारखान्याने गळीत हंगाम 2025-26 मध्ये 7,15,409.410 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून 5,88,540 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ज्यूस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा 12.30 टक्के प्राप्त झाला आहे. कारखान्याने आजअखेर 2,98,49,508 युनिट्स विजेची निर्यात केली आहे.

सध्या अर्कशाळा विभाग सुरू असून आजअखेर अर्कशाळा प्रकल्पामधून 1,98,52,806 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असून त्यापैकी 1,66,90,000 लिटर्स इथेनॉलचा पुरवठा ऑइल कंपन्यांना करण्यात आला आहे. तसेच 2,26,14,675 लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन झाले असून 1,01,370.68 किलो सीबीजीचे उत्पादन करण्यात आले आहे.

मांजरा कारखान्याने गळीत हंगाम 2025-26 साठी यापूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना 2750 रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे पहिला हप्ता अदा केला आहे.

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सध्या शेतकऱ्यांची उन्हाळी कामे सुरू आहेत. ऊस पिकासाठी खत तसेच मान्सूननंतरच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीने गळीत हंगाम 2025-26 मध्ये कारखान्यास गाळपास दिलेल्या उसासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी 100 रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे दुसऱ्या हप्त्याचे ऊस बिल कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या आदेशाने दिनांक 25 मे 2026 रोजी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

तसेच संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कारखाना प्रशासनाने केले आहे. दुसरा हप्ता खात्यावर जमा झाल्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026