निकालाच्या दडपणाखाली विद्यार्थी; १७ वर्षीय विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय

दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

निकालाच्या दडपणाखाली विद्यार्थी; १७ वर्षीय विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय

Student Mental Health

छत्रपती संभाजीनगर (Student Mental Health) : दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. निकालाच्या भीतीने दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुंडलिक नगर परिसरातील ही घटना असून, सोहम ज्ञानेश्वर मोरे (वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम हा दहावीत शिकत होता आणि आज त्याचा निकाल लागणार होता. मात्र, आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही, या भीतीने त्याच्या मनावर प्रचंड ताण निर्माण झाला होता. या मानसिक दडपणातूनच त्याने आज सकाळी राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं.

ही घटना पुंडलिक नगरमधील गल्ली क्रमांक १० येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

सोहमच्या या टोकाच्या निर्णयामुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा वाढता ताण आणि मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित सामग्री

मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली

मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली

Hingoli Judicial Workshop: न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना म्यानसिक स्वास्थ्याचा महत्त्व सांगितला. कामातील ताणवर उपचार आणि जिंदगी-कार्य सामतोलाचे मार्गदर्शन केले.

Jul 20, 2026
'कॉकरोच जनता पार्टी'ची मोठी मागणी; PM मोदींना अभिजीत दीपके यांचे खुले पत्र

'कॉकरोच जनता पार्टी'ची मोठी मागणी; PM मोदींना अभिजीत दीपके यांचे खुले पत्र

Cockroach Janta Party: NEET परीक्षेतील अनियमितता आणि तणावामुळेच 11 विद्यार्थ्यांना आत्महत्याप्रदर्शित झाली, या मुद्दावर अभिजीत दिप्के यांनी PM मोदीला एक खुल्या पत्र, 48 तासात पाच आत्महत्यांची नोंद

Jun 19, 2026
'आता तुमची बहीण...' पोस्ट व्हायरल; त्यानंतर अनीता बिश्नोईंनी विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती

'आता तुमची बहीण...' पोस्ट व्हायरल; त्यानंतर अनीता बिश्नोईंनी विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती

राजस्थानातील जोधपूर येथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोई यांच्याशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 04, 2026
'आई-बाबा, मला माफ करा...' NEET विद्यार्थिनीच्या सुसाईड नोटमधील शेवटचे शब्द

'आई-बाबा, मला माफ करा...' NEET विद्यार्थिनीच्या सुसाईड नोटमधील शेवटचे शब्द

मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी नागपुरात आपल्या कुटुंबासह राहत होती.

Jun 04, 2026
महागडा मोबाईल खरेदीवरून वाद; १६ वर्षीय शिवमची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

महागडा मोबाईल खरेदीवरून वाद; १६ वर्षीय शिवमची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

कुटुंबाने महागडा मोबाईल खरेदी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर १६ वर्षीय शिवम गोविंद शिंदे याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

May 16, 2026