महागडा मोबाईल खरेदीवरून वाद; १६ वर्षीय शिवमची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

कुटुंबाने महागडा मोबाईल खरेदी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर १६ वर्षीय शिवम गोविंद शिंदे याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

महागडा मोबाईल खरेदीवरून वाद; १६ वर्षीय शिवमची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Teen Suicide

आखाडा बाळापूर (Teen Suicide) : कुटुंबाने महागडा मोबाईल खरेदी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर १६ वर्षीय शिवम गोविंद शिंदे याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. एकुलता एक मुलगा गमावल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बिबथर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद शिंदे यांचा मुलगा शिवम हिंगोली येथे शिक्षण घेत होता. सुट्ट्यांमुळे तो बिबथर येथे आला होता. शुक्रवारी (ता. १५) वडिलांनी मोबाईल खरेदीसाठी पैसे दिल्यानंतर शिवमने आखाडा बाळापूर येथून मोबाईल खरेदी केला.

सायंकाळी सुमारे ५ वाजता घरी परतल्यानंतर “इतका महागडा मोबाईल कशाला घेतलास?” असा प्रश्न कुटुंबीयांनी विचारला. या किरकोळ वादातून रागाच्या भरात शिवमने घरातील एका खोलीत जाऊन गळफास घेतला.

बराच वेळ दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता शिवम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक रोहिनकर, जमादार शेख अन्सार आणि शिवाजी पवार यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. शनिवारी (ता. १६) सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिंदे कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करते. शिवमला दोन बहिणी असून एकुलत्या एक मुलाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026