'आता तुमची बहीण...' पोस्ट व्हायरल; त्यानंतर अनीता बिश्नोईंनी विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती

राजस्थानातील जोधपूर येथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोई यांच्याशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

'आता तुमची बहीण...' पोस्ट व्हायरल; त्यानंतर अनीता बिश्नोईंनी विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती

Social Media Influencer

जोधपूर (Social Media Influencer) : राजस्थानातील जोधपूर येथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोई यांच्याशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर सातत्याने होत असलेल्या ट्रोलिंग आणि टीकेमुळे मानसिक तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अनीता बिश्नोई यांची एक सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्या पोस्टमध्ये परिधान केलेल्या ड्रेसवरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका, ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया सहन कराव्या लागल्या. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या व्हिडिओंवर टीकात्मक आणि अवमानकारक प्रतिक्रिया देत त्यांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. "कपडे छोटे झाले तर, लाज कुठून येणार?", या आशयाच्या पोस्टमुळे त्यांना एका बाजूला पाठिंबा मिळाला, तर दुसऱ्या बाजूला तीव्र टीका आणि ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्यांना लक्ष्य करत सतत टीका करण्यास सुरुवात केली.

आपल्या व्हिडीओवरुन होणाऱ्या ट्रोलिंगमुळे अनीता बिश्नोई मानसिकदृष्ट्या खूपच खचल्या, असं सांगितलं जातंय. दरम्यान, त्यांनी सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, "आता तुमची बहीण तुमच्यासोबत राहणार नाही...", असं त्यांनी म्हटलेलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग, मानसिक आरोग्य आणि ऑनलाईन छळ यांसारख्या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व परिस्थिती आणि कारणांबाबत अधिकृत तपास सुरू असून, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या सततच्या ऑनलाईन छळामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्याचे बोलले जात आहे. घटनेपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेशही शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर सोशल मीडियावरील ट्रोलिंग, सायबरबुलिंग आणि मानसिक आरोग्य या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑनलाईन माध्यमांमधून होणारा सातत्यपूर्ण छळ, अपमानास्पद प्रतिक्रिया आणि वैयक्तिक टीका यांचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत यंत्रणांकडून तपास सुरू असून घटनेमागील सर्व परिस्थिती आणि कारणांचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अनीता बिश्नोई यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

ही घटना डिजिटल युगातील वाढत्या सायबर छळाच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारी ठरली असून, सोशल मीडियाचा वापर करताना संवेदनशीलता, जबाबदारी आणि संयम बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

संबंधित सामग्री

‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी कन्यारत्न

‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी कन्यारत्न

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण याच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

Sep 05, 2026
शाळेच्या पाहणीला गेलेल्या CJP टीमला गावकऱ्यांनी घेरलं; आशुतोष रांका यांच्यावर हल्ला

शाळेच्या पाहणीला गेलेल्या CJP टीमला गावकऱ्यांनी घेरलं; आशुतोष रांका यांच्यावर हल्ला

राजस्थानमध्ये सरकारी शाळांच्या पाहणीसाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP)च्या पथकावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Aug 21, 2026
पुण्यात रीलस्टारवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला, माधवी कुंभारसह 7 जण अटकेत

पुण्यात रीलस्टारवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला, माधवी कुंभारसह 7 जण अटकेत

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गुन्हेगारी आता सोशल मीडिया आणि रीलच्या दुनियेशी संबंधित तरुणांपर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

Aug 17, 2026
मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली

मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली

Hingoli Judicial Workshop: न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना म्यानसिक स्वास्थ्याचा महत्त्व सांगितला. कामातील ताणवर उपचार आणि जिंदगी-कार्य सामतोलाचे मार्गदर्शन केले.

Jul 20, 2026
रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; २५ दिवसांनी पती निलेश पाराध्येविरुद्ध गुन्हा दाखल

रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; २५ दिवसांनी पती निलेश पाराध्येविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे.

Jun 19, 2026