Someshwar Sugar Factory Election

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’; दोन्ही राष्ट्रवादी गटांची स्वतंत्र पॅनेलची तयारी

बारामतीतील सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता. युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवारांकडून तयारी सुरू.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’; दोन्ही राष्ट्रवादी गटांची स्वतंत्र पॅनेलची तयारी

Someshwar Sugar Factory Election

युगेंद्र पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती; सुनेत्रा पवारांच्या गाठीभेटी, ३० सप्टेंबरपर्यंत चित्र स्पष्ट होणार

पुणे : बारामतीतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा सहकाराच्या मैदानात येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेला ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्ष आता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार, तर दुसऱ्या बाजूने सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील पहिली महत्त्वाची निवडणूक ठरत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून स्वतंत्र पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू असल्याने या निवडणुकीकडे राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

युती होणार की स्वतंत्र पॅनेल?

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनाही सहभागी होत असल्याने राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट युती करून निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, सध्या प्रत्येक गटाकडून आपापले पॅनेल तयार करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे.

आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी चर्चेतून मार्ग काढत ही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप युतीसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार गटाच्या पॅनेलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्यासोबत युतीबाबत चर्चा झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.

दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांकडूनही युती झाल्यास एकत्रितपणे निवडणूक लढवू, अन्यथा स्वतंत्र पॅनेल उभे करू, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन्ही राष्ट्रवादी गट स्वतंत्रपणे निवडणुकीच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

३० सप्टेंबरनंतर चित्र स्पष्ट होणार

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. त्यामुळे या तारखेपूर्वी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही प्रयत्न होतात का, याकडे आता लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत राजकीय पातळीवर कोणती समीकरणे जुळतात आणि दोन्ही राष्ट्रवादी गट स्वतंत्र पॅनेलसह मैदानात उतरतात की काही वेगळे चित्र निर्माण होते, हे स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026