Sion Railway Station

सायन रेल्वे स्थानकात डॉक्टरचा टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न; पोलिस-अग्निशमन दलाच्या तत्परतेने जीव वाचला

सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. २७) सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सायन रेल्वे स्थानकात डॉक्टरचा टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न; पोलिस-अग्निशमन दलाच्या तत्परतेने जीव वाचला

Sion Railway Station

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. २७) सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नोकरीवरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ संबंधित व्यक्तीने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.

सकाळी सुमारे पावणे आठ ते आठच्या दरम्यान सायन स्थानकातील हाय व्होल्टेज टॉवरवर एक व्यक्ती चढल्याचे पोलिसांना समजले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत खाली येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने टॉवरवरच टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली आणले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी तातडीने CPR देऊन प्राथमिक वैद्यकीय मदत केली. या प्रयत्नांमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.

नोकरीवरून काढल्याचा राग

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी असून व्यवसायाने डॉक्टर आहे. संबंधित संस्थेत वैद्यकीय प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते.

नोकरीवरून झालेल्या कारवाईविरोधात त्याने सायन रेल्वे स्थानकातील टॉवरवर चढून आपला निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे आणि आपल्यावर अन्याय करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी त्याची मागणी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून पुढील तपास

या प्रकारामुळे सायन रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

बचावानंतर संबंधित डॉक्टरला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील संपूर्ण परिस्थिती तसेच नोकरीवरून काढण्याशी संबंधित बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026