विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

Vidarbha Junior College Teachers' Association: सत्र २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून, त्याआधारे सुरू करण्यात आलेली अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया तातडीने स्थगित करा...

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

Vidarbha Junior College Teachers' Association

 

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे शिक्षण विभागाला निवेदन

नागपूर (Vidarbha Junior College Teachers' Association) : सत्र २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून, त्याआधारे सुरू करण्यात आलेली अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा)**च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव, शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक यांना उद्देशून निवेदन सादर केले. हे निवेदन नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्यामार्फत देण्यात आले.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, सत्र २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये काही त्रुटी असून, त्या दुरुस्त होण्यापूर्वीच त्याच संच मान्यतेच्या आधारे अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याने समायोजनाची प्रक्रिया स्थगित करून संच मान्यतेतील त्रुटींची प्रथम दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन सादर करताना विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, सहसचिव डॉ. अभिजित पोटले, नागपूर ग्रामीण अध्यक्ष डॉ. नितीन देवतळे, नागपूर सचिव डॉ. गजानन धांडे तसेच नागपूर शहर कार्याध्यक्ष डॉ. शालिनी तेलरांधे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, संच मान्यता व अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेसंदर्भात भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी माहिती दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. संच मान्यतेतील त्रुटींची योग्य पडताळणी व दुरुस्ती करूनच पुढील प्रक्रिया राबवावी, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.

संबंधित सामग्री

ऑनलाईन संचमान्यतेच्या अन्यायकारक मसुद्याविरोधात शिक्षकांचा एल्गार

ऑनलाईन संचमान्यतेच्या अन्यायकारक मसुद्याविरोधात शिक्षकांचा एल्गार

विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शिक्षक-शिक्षिका उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

Jun 01, 2026
अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

Scholarship Examination: महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात ठेवण्याची मागणी केली होती, मात्र शिक्षण परिषदेने ती नाकारली

Apr 25, 2026
टीईटी विरोधात शिक्षकांचा एल्गार; हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन

टीईटी विरोधात शिक्षकांचा एल्गार; हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन

TET Exam Elgar: हिंगोलीत, टीईटी विरोधात शिक्षकांनी भव्य धरणे आंदोलन केले. शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री व शासनाकडे विविध मागण्या सादर केल्या. आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा.

Apr 20, 2026