तहसीलदार शारदा दळवी

..अखेर वसमतच्या वादग्रस्त तहसीलदार शारदा दळवी निलंबित

Tehsildar Sharda Dalvi: वसमत तालुक्यातील तहसीलदार शारदा दळवी यांना अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात निष्काळजीपणा व दुर्लक्ष दाखवल्याबद्दल निलंबित करण्यात आले.

..अखेर वसमतच्या वादग्रस्त तहसीलदार शारदा दळवी निलंबित

Tehsildar Sharda Dalvi

अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक घोटाळा आला अंगलट,गंभीर तक्रारीची शासनाने घेतली दखल

वसमत (Tehsildar Sharda Dalvi) : येथील वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या विरोधात असलेल्या एकापेक्षा एक गंभीर तक्रारीची शासनाने दखल घेतली अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक यासारख्या महत्त्वाच्या विषयात निष्काळजीपणा ,दुर्लक्ष,गैर व्यवहाराची प्रकरणे अधिकारी कर्मचार्‍यांनी  केलेल्या गंभीर तक्रारी या सर्व प्रकाराची दखल शासनाने घेतली व अपेक्षेप्रमाणे अखेर निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधीनतेने  निलंबनाचे आदेश महाराष्ट्र राज्याचे अवरसचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने नऊ एप्रिल रोजी सायंकाळी काढण्यात आले आहेत. (Tehsildar Sharda Dalvi) तहसीलदारांच्या कारभारासंदर्भात देशोन्नतीने सतत पाठपुरावा केला होता.

वसमत तालुक्यात तहसीलदाराच्या आशीर्वादाने अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक माफियांचा धुमाकूळ सुरू होता ,'ड्रायव्हरच्या खांद्यावर बंदूक' ठेवून सेफ राहण्याचा प्रकार झाकून राहिला नव्हता तहसीलदाराचे आशीर्वादाने तालुक्यात सुरू असलेला अवैध उत्खननाचा बाजार, शासनाच्या तिजोरीचे नुकसान, वाळू घाटावरील रात्रंदिवस वाळूचा उपसा जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती, वसुलीच्या कामासाठी खाजगी व्यक्तीची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू होता खाजगी व्यक्ती, ड्रायव्हर तहसीलदार असल्यासारखे रुबाबात शासकीय कर्मचार्‍यांनाही दाबत होते तलाठी मंडळ अधिकारी शोभेचे वस्तू होऊन बसले होते.

कर्मचार्‍यांनी अवैध वाहतूक करणार्‍या वाहना विरोधात कारवाई केली तरी व्हाट्सअप कॉल वरून वेगळेच आदेश यायचे त्यातून  कर्मचार्‍यांची गोची व्हायची, तहसीलदार शारदा दळवी यांच्या कार्यकाळात तलाठ्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या टोळ्यांकडून झाले होते अवैध उत्खनन वाहतूक यांच्याकडून वसुली करण्यासाठी विविध खाजगी व्यक्तीची नेमणूक करून त्यांना शासकीय कर्मचार्‍यासारखे पावर देण्यात आल्याचाही आरोप होत होता गाडीवरील ड्रायव्हर ,पुरवठादार झेरॉक्सवाला, माळवट्याचा स्टोनक्रेशर वाला यांच्यासारख्या अनेक खाजगी व्यक्तींचा महसूल विभागात हस्तक्षेप वाढला होता त्यातून शासनाच्या तिजोरीला चुना लावल्या जात होता.

तहसीलदार शारदा दळवी (Tehsildar Sharda Dalvi) यांच्या विरोधात तहसील कार्यालयातील तत्कालीन नायब तहसीलदार, विद्यमान मंडळाधिकारी यांनीही गंभीर स्वरूपाच्या लेखी तक्रारी केल्या होत्या  त्या तक्रारीवरून तहसीलदार शारदा दळवी यांची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापन करण्यात आली होती, विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही तहसीलदार शारदा दळवी यांच्या विरोधात थेट महसूल मंत्र्यांपर्यंत पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या त्या प्रकरणाची ही चौकशी सुरू होती एवढ्या गंभीर तक्रारी असतानाही तहसीलदार शारदा दळवी यांचा कारभार सुधारत नव्हता उलट अरेरावी, अडवणूक, कर्मचार्‍यांना अपमानित करणे असे प्रकार घडत होते त्यातून उद्रेक वाढत गेला तहसीलदार शारदा दळवी यांच्या कारभाराला वसमतकर वैतागले होते यांच्या त्रासातून मुक्त करावी त्यांची बदली करावी अशी स्पष्ट मागणी करणारे निवेदनही देण्यात आले होते.

अखेर या सर्व  प्रकाराची गंभीर दखल शासनाने घेतली व गुरुवारी सायंकाळी तहसीलदार शारदा दळवी (Tehsildar Sharda Dalvi) यांच्या निलंबनाचे आदेश येऊन धडकले व महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहेत तहसीलदार शारदा दळवी यांनी तहसीलदार पदावर  कार्यरत असतांना यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तसेच अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यासारख्या अतिमहत्त्वाच्या शासकीय कर्तव्यात निष्काळजीपणा व दुर्लक्ष करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याने श्रीमती शारदा दळवी, वसमत तहसिलदार  यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीअन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने निलंबित करण्यात आले असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे महसूल विभागात या कारवाईने खळबळ उडाली असली तरी अतिरेक झाला होता त्यामुळे त्यांचे निलंबन अपेक्षित होते अशाच प्रतिक्रिया सर्व सामान्यातून व्यक्त होत आहेत.

खंबीर पाठपुराव्याची दखल

तहसीलदार शारदा दळवी (Tehsildar Sharda Dalvi) यांच्या विरोधात तत्कालीन नायबतहसीलदार विलास तेलंग, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे यांनी गंभीर स्वरूपाच्या लेखी तक्रारी शासनाकडे केल्या होत्या त्यावरून चौकशी समिती स्थापन झाली होती तसेच रिपाई आठवले गटाचे कामगार आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाळजे यांनीही महसूल मंत्र्यापर्यंत पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या चौकशी समितीमध्ये त्यांच्याही तक्रारीची चौकशी सुरू होती त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विष्णू जाधव, आनंद खरे, काशिनाथ टोम्पे, पत्रकार भगवान जाधव, सुमित मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकार्‍यांच्या गंभीर तक्रारी होत्या कार्यकर्त्यांनी व पुराव्या सह तक्रारी करून खंबीर पाठपुरावा केला त्यातून शासनाला दखल घेणे भाग पडले व अखेर नियमबाह्य पद्धतीने वागणार्‍या शासनाच्या तिजोरीचे नुकसान करणार्‍या तहसीलदार शारदा दळवी (Tehsildar Sharda Dalvi) यांना निलंबित करण्याची कारवाई शासनाला करणे भाग पडले ही घटना सर्व अधिकार्‍यांसाठी एक धडा म्हणून पाहिले जात आहे  दिलेल्या तक्रारी व गौण खनिज उत्खनन अवैध वाहतूक या संदर्भात देशोन्नतीनेही पाठकायम पाठपुरावा केला होता हे विशेष.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

Sep 30, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026