Sengaon Deer Hunting

सेनगावमध्ये धनगरवाडी शिवारात हरिणाच्या मांसाची वाटणी करताना दोघे ताब्यात; कातडी-जाळे जप्त

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात हरिणाची शिकार करून त्याचे मांस आपसात वाटून घेत असलेल्या दोघांना वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने रविवारी रंगेहाथ पकडले.

सेनगावमध्ये धनगरवाडी शिवारात हरिणाच्या मांसाची वाटणी करताना दोघे ताब्यात; कातडी-जाळे जप्त

Sengaon Deer Hunting

वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; १६ किलो मांसासह दोघे ताब्यात

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात हरिणाची शिकार करून त्याचे मांस आपसात वाटून घेत असलेल्या दोघांना वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने रविवारी रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान आरोपींकडून १६ किलो हरिणाचे मांस, कातडी आणि शिकार करण्यासाठी वापरलेले जाळे जप्त करण्यात आले.

हरिणाची शिकार केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर संबंधित परिसरावर मागील दहा दिवसांपासून लक्ष ठेवण्यात येत होते. रविवारी शिकार केलेल्या हरिणाच्या मांसाची वाटणी सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर तातडीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वन अधिकारी सचिन माने, वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप मोरे, जमादार साईनाथ कंठे, कुमार मगेर व सुभाष घुगे यांनी छापा टाकला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, या शिकारीच्या घटनेत आणखी काही व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांची सध्या कसून चौकशी सुरू असून, शिकारीमागील इतर सहभागींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या प्रकरणात वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
अनोळखी मृतकाची ५ तासांत ओळख; दीड लाखांच्या सुपारीतून विष पाजून हत्या, चार आरोपी जेरबंद

अनोळखी मृतकाची ५ तासांत ओळख; दीड लाखांच्या सुपारीतून विष पाजून हत्या, चार आरोपी जेरबंद

बुलढाण्यातील तढेगाव शिवारातील तरुणाच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ५ तासांत उलगडा केला. दीड लाखांची सुपारी देऊन विष पाजून हत्या केल्याप्रकरणी चार आरोपी जेरबंद.

Sep 12, 2026
वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

नांदेड शहरातील फुले मार्केट परिसरात वेलनेस स्पा सेंटरच्या आड सुरू असल्याचा आरोप असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Sep 05, 2026
परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले.

Aug 28, 2026
हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत; स्थानिक गुन्हे शाखा मात्र झोपेत

हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत; स्थानिक गुन्हे शाखा मात्र झोपेत

नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी १ ते ३१ ऑगस्टदरम्यान अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, शस्त्र अधिनियमांतर्गत विशेष निर्मूलन मोहीम-२ उघडली आहे.

Aug 22, 2026