​संतोष भुतेकर आंदोलन

​संतोष भुतेकर यांच्या आंदोलनाला यश; प्रतापनगर अंधारातून उजेडात!

Santosh Bhutekar Protest: युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी उभारलेल्या आंदोलनाला यश. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे महावितरणकडून आवश्यक निधी उपलब्ध

​संतोष भुतेकर यांच्या आंदोलनाला यश; प्रतापनगर अंधारातून उजेडात!

Santosh Bhutekar

 

​डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणकडून नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

चिखली (Santosh Bhutekar Protest) : इसरूळ हद्दीतील प्रतापनगर येथील ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर (Santosh Bhutekar) यांनी उभारलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे महावितरणकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देत नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला आहे. महावितरणने जलद गतीने काम पूर्ण करून ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केल्याने प्रतापनगरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​उसाची शेती अन् वाघाची दहशत; अंधारात सुरक्षेचा प्रश्न
​प्रतापनगर येथे सिंगल फेज वीजवाहिनी तसेच एजी फिडरच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांना अनेकदा रात्रीच्या वेळी अंधारात राहावे लागत होते. खडकपूर्णा प्रकल्पाच्या काठावर वसलेले प्रतापनगर, परिसरात असलेला वाघांचा वावर आणि चारही बाजूंनी असलेली उसाची शेती यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला होता. विशेषतः महिला, वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

​आक्रमक आंदोलन अन् वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा
​वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला; मात्र प्रश्न सुटत नसल्याने अखेर युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर (Santosh Bhutekar) यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनाने प्रश्नाची तातडीने दखल घेतली. ​दरम्यान, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही या विषयात लक्ष घालत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. तसेच मुंबई येथे संबंधित सचिव व ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या अडचणीचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आवश्यक निधी मंजूर करून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर महावितरणकडून नवीन ट्रान्सफॉर्मर उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.

​थाटात पार पडले उद्घाटन; ग्रामस्थांनी साजरी केली 'दिवाळी'
​नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिनभाई कदम, गोपाल खेडेकर, वायरमन वाघमारे, दीपक पाटील पुंगळे, कृष्णा पाटील भुतेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
​नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर प्रतापनगरमध्ये नियमित वीजपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अंधारात जीवन जगणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण दिसून आले.

ग्रामस्थांनी संतोष भुतेकर (Santosh Bhutekar) यांच्या आंदोलनाला आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्याला या यशाचे श्रेय दिले. यावेळी ग्रामस्थांकडून फराळ व मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. "आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही," अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.

संबंधित सामग्री

दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

Akola Women Morcha: गावागावात वाढत असलेल्या अवैध गावठी दारूच्या विक्रीला आळा घालावा तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित लाभ पात्र महिलांना तातडीने मिळावा

Aug 18, 2026
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

Shiv Sena Uddhav Thackeray: लातूर शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी अनेक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला.

Jul 27, 2026
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

Nanded Planning Committee: नांदेड जिल्ह्यातील शेतकाम, आरोग्य, शिक्षण, बिजली, पाण्याच्या पुरवठे आणि संरक्षण यासह पायाभूत ढांचा विकसित करण्यासाठी समन्वयात्मक कार्रवाईचे निर्णय घेण्यात आले.

Jul 17, 2026
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आढावा बैठक 

शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आढावा बैठक 

Latur Shiv Sena: लातूर जिल्ह्यात शिवसेनेच्या संचालनाचे आढावा बैठक शनिवारला घेण्यात आले. आमदास दानवे यांच्या मागणीवरून बुधपाक्षप्रमुख व उद्धव ठाकरे

Jun 14, 2026
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

Scheduled Caste Andolan: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात चिखलीत समाजबांधवांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनात संविधानाच्या कलम 14, 15, 16 व 341 यांचा उल्लेख

Jun 04, 2026