अकोला महिला मोर्चा

दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

Akola Women Morcha: गावागावात वाढत असलेल्या अवैध गावठी दारूच्या विक्रीला आळा घालावा तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित लाभ पात्र महिलांना तातडीने मिळावा

दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

Akola Women Morcha

अकोला (Akola Women Morcha) : गावागावात वाढत असलेल्या अवैध गावठी दारूच्या विक्रीला आळा घालावा तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित लाभ पात्र महिलांना तातडीने मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी सावरगाव, झरंडी, नवेगाव, पिंपळडोळी, उंबरवाडी व आलेगाव परिसरातील महिलांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला.

परिसरातील गावांमध्ये गावठी दारूची विक्री व निर्मिती वाढल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये भांडणे, कौटुंबिक कलह आणि महिलांचा छळ वाढत असल्याचा आरोप महिलांनी केला. स्वस्त दरात सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे अनेक नागरिक व्यसनाधीन होत असून त्याचा विपरीत परिणाम लहान मुलांच्या शिक्षणावरही होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सावरगाव–झरंडी रस्त्यावर दारूच्या कारणामुळे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना तसेच सावरगाव येथील एका २४ वर्षीय युवकाने दारूच्या व्यसनामुळे आत्महत्या केल्याची घटना या परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करतात, असे आंदोलकांनी सांगितले. (Akola Women Morcha) त्यामुळे परिसरातील गावांमध्ये अवैध दारूची विक्री व निर्मिती तातडीने बंद करून संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित लाभ मिळावा

महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अनेक पात्र महिलांना मागील काही महिन्यांपासून लाभ मिळत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

KYC संदर्भातील अडचणींमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. अनेक महिलांना बँकेची KYC करणे आवश्यक असल्याचे समजून त्यांनी बँकेत KYC पूर्ण केली, आधार अपडेट करून बँक खात्याशी जोडला; मात्र योजनेसाठी आवश्यक असलेली आधार-आधारित e-KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा लाभ प्रलंबित राहिला आहे.

त्यामुळे पात्र महिलांची KYC/e-KYC प्रक्रिया सुलभ करून त्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने खात्यात जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली.

प्रमुख मागण्या: 

1. सावरगाव, झरंडी, नवेगाव, पिंपळडोळी, उंबरवाडी, आलेगाव व परिसरातील गावांमध्ये अवैध गावठी दारूची विक्री व निर्मिती तातडीने बंद करावी.
2. अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
3. दारूमुळे महिलांवर होणारा कौटुंबिक छळ रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.
4. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित लाभ पात्र महिलांना तातडीने द्यावा.
5. KYC/e-KYC प्रक्रियेतील अडचणी दूर करून ग्रामीण भागातील पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची व्यवस्था करावी.
6. दारूच्या व्यसनामुळे प्रभावित कुटुंबांसाठी जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान प्रभावीपणे राबवावे.

“दारूमुक्त गाव – सुरक्षित कुटुंब – सक्षम महिला” असा संदेश देत महिलांनी या आंदोलनातून प्रशासनाने दोन्ही प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

या (Akola Women Morcha) मोर्चाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी केले होते. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रमुख उपस्थिती  समाधान गाढवे, सागर लाड, अतुल वसतकार , शंकर जाधव, मयूर गावंडे  गुलाब अंभोरे, विशाल इंगळे होते.

संबंधित सामग्री

श्री शिवाजी महाविद्यालयात 'मिशन परिवर्तन' अंतर्गत व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

श्री शिवाजी महाविद्यालयात 'मिशन परिवर्तन' अंतर्गत व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

Mission Transformation Yojana: 'मिशन परिवर्तन – वाटचाल नशामुक्तीकडे' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि यशस्वी करिअर या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

Jul 28, 2026
हिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli illegal liquor sale: हिंगोली जिल्ह्यातील एक विशेष कारवाईत अवैध दारूविक्री आणि वाहतूक विरोधात १.६५ लाख रुपये किमतीचे माल जप्त करण्यात आले. विभागाने १८० मिलीच्या बाटल्या,

May 25, 2026