परभणीच्या नांदगाव शिवारात वाळू माफियांवर कारवाई

पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने शनिवार, १६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास नांदगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर छापेमारी केली.

परभणीच्या नांदगाव शिवारात वाळू माफियांवर कारवाई

Sand Mafia Action

पोलिस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; जेसीबी यंत्र जप्त, बोट केली नष्ट

परभणी (Sand Mafia Action) : पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने शनिवार, १६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास नांदगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर छापेमारी केली. या कारवाईत जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. तसेच वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी बोट नष्ट करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक टरके, पोलिस अंमलदार सुर्यकांत ताटीकोंडलवार, सय्यद इरशाद, वाघमारे, चुडावेकर, शेख असलम, वाव्हळे यांच्या पथकाने अवैध धंद्याची माहिती घेत गस्त घालत असताना नांदगाव शिवारात पूर्णा नदी पात्रातून चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकत एक जेसीबी यंत्र आणि बोट जप्त केली. घटनास्थळी मोहम्मद तोहीद मोहम्मद कुरशीद हा इसम आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून जेसीबी यंत्र जप्त केले. तसेच घटनास्थळी आढळलेली वाळू उपशासाठी वापरली जाणारी बोट मंडळाधिकारी शिंदे व त्यांच्या पथकाने जागीच नष्ट केली.

देशोन्नतीचे प्रतिनिधी कारवाईच्या ठिकाणी पोहोचताच अवघ्या अर्ध्या तासात बोट स्फोटाद्वारे नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली.

महसूलचे पथक, पूर्णा पोलिस ‘मॅनेज’?

पोलिस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई केलेल्या ठिकाणी महसूल विभागाचे पथक देखील उपस्थित होते. या पथकातील कर्मचारी वाहन उभे करून रिंगण मारून बसले होते. या ठिकाणाहून सुरू असलेल्या वाळू उपशाकडे पूर्णा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. महसूल व पूर्णा पोलिसांचे पथक ‘मॅनेज’ असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026