आमदार सदाभाऊ खोत

आ.सदाभाऊ खोत यांच्याकडून भोसीच्या माळराणावरील 'नंदनवनाचे' कौतुक

MLA Sadabhau Khot: नांदेडमध्ये विधी मंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यात आ. सदाभाऊ खोत यांनी भोसीच्या माळराणावर फळबागांची पाहणी केली आणि शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांची प्रगतीचे कौतुक केले.

आ.सदाभाऊ खोत यांच्याकडून भोसीच्या माळराणावरील 'नंदनवनाचे' कौतुक

MLA Sadabhau Khot

शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांच्या फळबागेला दिली भेट

नांदेड (MLA Sadabhau Khot) : विधी मंडळ अंदाज समिती सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान गुरुवारी समितीचे सदस्य आणि माजी आ. सदाभाऊ खोत  (MLA Sadabhau Khot) यांनी भोकर मतदारसंघातील भोसी येथील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या फळबागेला अचानक भेट दिली. माळराणासारख्या खडकाळ जमिनीत फुलवलेली ही फळबाग पाहून त्यांनी शेतकऱ्याचे विशेष कौतुक केले.

​भोसी येथील प्रगतशील शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांनी आपल्या माळराणावरील शेतात विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी या बागेला भेट देऊन पाहणी केली. केवळ पारंपरिक पिके न घेता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गायकवाड यांनी माळराणावर जे प्रयोग केले आहेत, ते पाहून खोत थक्क झाले.

​या भेटीदरम्यान सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी बागेतील विविध फळझाडांची सविस्तर माहिती घेतली. गायकवाड यांच्या बागेत जपानचा प्रसिद्ध 'मियाझाकी' आंबा, थायलंडचा 'रेड आयवरी', बनाना आंबा, तसेच पांढरा जांभूळ आणि सफरचंद यांसारख्या दुर्मिळ व विदेशी फळझाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. अत्यंत कष्टाने माळराणावर हे नंदनवन फुलवल्याबद्दल खोत यांनी गायकवाड कुटुंबीयांचे अभिनंदन केले.​याप्रसंगी नंदकिशोर गायकवाड, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी मंडळ अंदाज समितीच्या या भेटीमुळे आणि सदाभाऊ खोत यांनी केलेल्या कौतुकामुळे भोसी येथील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026
सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर. जमीन महसूल, पीक कर्ज आणि कृषीपंप वीजबिलात सवलती; सुनेत्रा पवार, पंकजा मुंडेंकडून पाहणी.

Sep 26, 2026