रस्त्यात आडवून हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीला अटक; ४ गुन्हे उघड

घटनांनंतर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.

रस्त्यात आडवून हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीला अटक; ४ गुन्हे उघड

Robbery Case

हिंगोली (Robbery Case) : हिंगोली व नांदेड जिल्ह्यात हत्याराचा धाक दाखवत मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह टोळीतील इतर चार जणांना अटक करून एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दि. १० ते ११ मे २०२६ दरम्यान रात्री मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी कु्रुंदा हद्दीतील भेंडेगांव रेल्वे गेटजवळ, औंढा ना. येथील विक्रम हॉटेल, हट्टा येथील एरंडेश्वर ते दारेफळ रोड तसेच नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर येथे नागरिकांना अडवून हत्याराचा धाक दाखवत मोबाईल व रोख रक्कम जबरीने लुटली होती.

या घटनांनंतर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.

पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे व पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे हा गुन्हा नांदेड येथील किसन रमेश सुर्यवंशी (रा. शिव नगर) व आदित्य उर्फ आद्या शिवाजी जाधव (रा. खोब्रागडे, गल्ली नं. २) यांनी इतर चार साथीदारांसह केल्याचे निष्पन्न केले.

दि. १५ मे रोजी पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना चौंडी येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून सॅमसंग, व्हिवो, पोको, मोटोरोला, ओप्पो कंपनीचे ७ मोबाईल, एक पल्सर मोटारसायकल व एक खंजीर असा एकूण २ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार सुभाष घुगे, कोंडीबा मगरे, सतीष जाधव, विक्रम कुंदनानी, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, किशोर सावंत, दत्ता नागरे व मारोती काकडे यांच्या पथकाने केली.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026