Road Accident

चाकूरजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

चाकूर तालुक्यातील घरणी येथे दोन मोटारसायकलींच्या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

चाकूरजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Road Accident

चाकूर प्रतिनिधी : चाकूर तालुक्यातील घरणी येथे दोन मोटारसायकलींच्या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमीवर प्राथमिक उपचारासाठी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालय, लातूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाकूर तालुक्यातील लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाजवळ, ग्रामीण आयटीआयसमोर मोटारसायकल क्रमांक MH 24 BC 9683 आणि MH 55 D 7607 यांची समोरासमोर धडक झाली.

या भीषण अपघातात देविदास सखाराम चव्हाण (वय 50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ते अहमदपूर तालुक्यातील वरवटी तांडा येथील रहिवासी असल्याचे समजते.

तर शेख रहमान गुलाब (वय 22, रा. चाकूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी शेख रहमान यांना तातडीने चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026