रिसोड सरपंच पोटनिवडणूक

रिसोड तालुक्यातील सरपंच पदाच्या पोटनिवडणूक निकाल घोषित

Risod Sarpanch by-election: रिसोड तालुक्यातील पिंपरखेड वाडी आणि वडजी या गावातील सरपंच पदाच्या पोटनिवडणूक निकाल 29 एप्रिल रोजी घोषित करण्यात आले.

रिसोड तालुक्यातील सरपंच पदाच्या पोटनिवडणूक निकाल घोषित

Risod Sarpanch by-election

रिसोड (Risod Sarpanch by-election) : तालुक्यातील पिंपरखेड / वाडी व वडजी या गावातील सरपंच पदाच्या पोटनिवडणूक निकाल दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी घोषित करण्यात आला. या दोन्ही गावासाठी दिनांक 28 एप्रिल रोजी मतदान झाले होते. रिसोड तहसील कार्यालयांमध्ये सदर निवडणूक मतमोजणी करण्यात आली. यामध्ये पिंपरखेड / वाडी येथून सुनिता दीपक जायभाय यांनी  शारदा दत्ता घुगे यांचा 52 मतांनी पराभव केला. वडजी येथून गजानन नरसिंगराव देशमुख यांनी केशवराव श्रिरंगराव बोरकर यांचा 344 मतांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर विजय उमेदवारांनी आपापल्या गावात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळून पेढे वाटून आतिषबाजी व विजयाच्या घोषणांनी गाव अक्षरशा धुंदुमले होते.

पिंपरखेड वाडी येथे उमेदवारांना मिळालेली मते:
सुनिता जायभाय 336
शारदा घुगे         284
नोटा                   11
एकूण मते         631

वडजी येथे उमेदवारांना मिळालेली मते:
गजानन देशमुख     634
केशवराव बोरकर    290
नोटा                          8
एकूण मते              932

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026