Risod Municipal Council

रिसोड नगर परिषदेची रस्त्यावरील मोकाट जनावरांवर धडक कारवाई; १२ नागरिकांकडून दंड वसूल

रिसोड शहर आणि मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे व गाई ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता.

रिसोड नगर परिषदेची रस्त्यावरील मोकाट जनावरांवर धडक कारवाई; १२ नागरिकांकडून दंड वसूल

Risod Municipal Council

रिसोड : रिसोड शहर आणि मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे व गाई ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. या समस्येची गंभीर दखल घेत रिसोड नगर परिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबवून रस्त्यावरील ढोर-गाईंना पकडून नगर परिषदेच्या कोंडवाड्यात जमा करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ निष्काळजी नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

रस्त्यावर मोकाट सोडून दिलेल्या जनावरांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता, तसेच अपघातांचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम हाती घेण्यात आली.

ही कारवाई आरोग्य निरीक्षक रोहित बढेल यांच्या थेट नियंत्रणाखाली पार पडली. तसेच सफाई मुकादम नीरज नकवाल आणि शिवाजी शेलार यांच्यासह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात दाखल केले.

नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना व पशुपालकांना कडक इशारा देण्यात आला आहे की, त्यांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत. स्वतःच्या जनावरांची व्यवस्था स्वतःच्या जागेतच करावी. यापुढेही रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्यास ती जप्त करून मालकांवर अधिक कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026